आषाढी एकादशीनंतर होणार शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ? दिल्लीत झाली चर्चा

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावरावर चर्चा मुंबईत करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या संभ्याव शपथविधीची तारिख समोर आली आहे.
EknathShinde And Devendra Fadnavis
EknathShinde And Devendra Fadnavis saam tv

सुमित सावंत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सारे दावे फेटाळले. तर शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावरावर चर्चा मुंबईत करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या संभ्याव शपथविधीची तारिख समोर आली आहे. येत्या बुधवारी शपथविधी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ( Shinde Government cabinet Expansion New Date)

EknathShinde And Devendra Fadnavis
मोठी बातमी! यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार श्री विठ्ठल महापूजेचा मान

राज्यात शिंदे सरकार विराजमान झाल्यावर साऱ्यांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या पारड्यात कोणती मंत्रीपदे मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान शिंदे सरकारचा शपथविधी १३ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. तर गुरुपौर्णिमा असल्याने १३ जुलै रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जी खाती होती, ती भाजपकडे जातील. तर शिवसेनेकडे जी खाती होती, ती एकनाथ शिंदे गटाकडे जातील. दिल्लीतील बैठकीत सदर मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

EknathShinde And Devendra Fadnavis
राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर; राजकीय पक्ष काय भूमिका घेणार ?

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा; शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी मिळाली आहे. तर विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना उमेदवारी मिळाली आहे. या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती शिवसेना खासदारांकडून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com