
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जी-20 निमंत्रण पत्रिकेवरील 'प्रेसिडेंट ऑफ भारत' या उल्लेखामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केंद्र सरकार देशासाठी 'भारत' वापर केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. 'भारत माता की जय, म्हणत मुख्यमंत्र्यांनी बदलाचे स्वागत केले आहे. (Latest Marathi News)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जी-20 निमंत्रण पत्रिकेवरील 'प्रेसिडेंट ऑफ भारत' उल्लेख आल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहे. काँग्रेसकडून या बदलाचा कडाडून विरोध करण्यात येत आहे. तर भाजप आणि त्यांच्या समर्थक पक्षाकडून या बदलाचे स्वागत होताना दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलाचे स्वागत करत ट्विटमध्ये म्हटले की, 'केंद्र सरकारने G-20 परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रावर 'इंडिया' ऐवजी 'भारत' असा उल्लेख केला आहे. हा उल्लेख निश्चितच अभिमानास्पद आहे'.
'देशाच्या राज्यघटनेमध्येच India that is 'Bharat' असा स्पष्ट उल्लेख असून राज्यघटनेने देखील हे नाव मान्य केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात 'भारत माता की जय' हीच घोषणा प्रत्येक देशवासियांच्या मुखातून ऐकू येत होती', असे ते म्हणाले.
'साने गुरुजींनी देखील बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो… असेच आपल्या कवितेद्वारे देशाचे वर्णन केले. हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेल्या देशाला 'भारत' या नावाने ओळखले जावे हे अभिमानास्पद आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचे ठरवले असल्यास या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. भारत माता की जय!, असे त्यांनी पुढे म्हटले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.