धोकादायक पोलीस वसाहतींचा प्रश्न ऐरणीवर; पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' महत्वपूर्ण माहिती

धोकादायक पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.
Eknath Shinde news
Eknath Shinde news saam tv

सुमित सावंत

मुंबई : मुंबईतील अनेक पोलीस (Police) वसाहतींची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या धोकादायक वसाहतींमध्ये राहणारे पोलिसांचे कुटुंबीय जीव मुठीत धरून जगत आहेत. या धोकादायक वसाहतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: जाऊन पाहिली तसेच पोलीस कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांची अडचण जाणून घेतली. तसेच यावेळी धोकादायक पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. ( Eknath Shinde News )

Eknath Shinde news
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर CM एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

बोरिवली पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या पोलीस वसाहतीला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीच्या सद्यस्थितीची पहाणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'पोलीस वसाहतींचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित असून त्यावर तोडगा काढण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील आपली चर्चा झालेली आहे. मागे याबाबत धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर या प्रश्नात पुन्हा एकदा लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. यासाठी लवकरच गृह विभागातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बैठक घेण्यात येणार आहे'.

Eknath Shinde news
राज्यात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी CM एकनाथ शिंदे यांनी दिले 'हे' महत्वाचे निर्देश

पोलीस वसाहतींची माहिती घेतल्यावर त्यात राहणाऱ्या पोलीस कुटूंबियांसोबत देखील त्यांनी संवाद साधला. यावेळी लवकरात लवकर तुमच्या घरांचा प्रश्न सोडवला जाईल तसेच पोलीसांच्या घरांची संख्या वाढवण्याचा देखील प्रयत्न केला जाईल, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार रवींद्र फाटक, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com