Ramdas Kadam Birthday : 'रामदास कदम नावाची तोफ...'; मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसानिमित्त व्यक्त केली अपेक्षा

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना मुख्यमंत्र्यासहित अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे आज माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा देखील वाढदिवस आहे.
Ramdas kadam Birthday
Ramdas kadam Birthday saam tv

सुमित सावंत

मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना मुख्यमंत्र्यासहित अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे आज माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना त्यांच्या कांदिवली येथील पालखी या निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या. तसेच 'रामदास कदम नावाची मुलुखमैदान तोफ पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी मैदानात यावी,अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी व्यक्त केली. (Eknath Shinde News )

Ramdas kadam Birthday
Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार यांची शिंदे सरकारवर जोरदार टीका; 'प्रत्येक फाईल...'

राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ट्रायडन्ट हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीत त्यांनी रामदास कदम यांची शिवसेना पक्षाच्या नेतेपदी निवड केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर रामदास कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आज झालेल्या या सदिच्छा भेटीला एक विशेष महत्व होते.

Ramdas kadam Birthday
Buldhana : त्रस्त शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्री शिंदे यांना कॉल; ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

वाढदिवसानिमित्त रामदास कदम यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ' शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर डौलाने फडकत असतानाच रामदास कदम नावाची मुलुखमैदान तोफ पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी मैदानात यावी'. आपल्या राजकीय आयुष्याची ही इनिंग रामदास कदम यांनी पुन्हा त्याच जोशाने सुरु करावी याच शुभेच्छा त्यांनी यावेळी कदम यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी रामदास कदम यांचे दोन्ही पुत्र आमदार योगेश कदम आणि सिद्धेश कदम, आमदार बालाजी कल्याणकर आणि कदम कुटुंबीय उपस्थित होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com