CM एकनाथ शिंदेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे.
Eknath Shinde/Uddhav Thackeray
Eknath Shinde/Uddhav ThackeraySaam TV

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून तसेच त्यांच्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहलं आहे, 'महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.' अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. त्यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर हे एकप्रकारे ठाकरे समर्थकांकडून शक्तिप्रदर्शनच असल्याचं बोललं जात आहे.

Edited By - Jagdish patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com