CM Uddhav Thackeray Live: काहींना बाळासाहेब झाल्यासारखे वाटते; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

कधी मराठीवर बोलतात. कधी भगवी शाल घेवून फिरतात, असंही उद्धव ठाकेर म्हणाले.
CM Uddhav Thackeray Live: काहींना बाळासाहेब झाल्यासारखे वाटते; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
CM Uddhav Thackeray LiveSaam Tv

मुंबई : शिवसेनेची (Shivsena) आज मुंबईत मास्टर सभा झाली. या सभेत मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राज ठाकरे यांच्यावर टीका केली. भगवी शाल अंगावर घेतली म्हणून काहींना बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखे वाटत आहे, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज ठाकरे यांना लगावला. (CM Uddhav Thackeray Live)

मुन्नाभाई या चित्रपटातील किस्सा सांगत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. संजय दत्तला गांधीजी दिसतात तेव्हा तो गांधीगीरी करायला लागतात. तशीच केस आपल्याकडे एक आहे. कधी मराठीवर बोलतात. कधी भगवी शाल घेवून फिरतात, त्यांना बाळासाहेब झाल्यासारखे वाटत आहे. पण मुन्नाभाई लोकांच भल तरी करायचा हा कोणाच भल करतोय, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) लगावला.

CM Uddhav Thackeray Live
CM Uddhav Thackeray Live:...तर 'आरएसएस'ची टोपी काळी का?; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, अयोध्येत मशिद पाडण्यासाठी तुम्ही होता म्हणता तर मग देवेंद्रजी फक्त तुमच्या वजनाने बाबरी पडली असती. फडणवीस यांचे १ मे रोजी भाषण झाले. यावेळी त्यांनी भगवी टोपी घालून भाषणं केलं होतं. हिंदुत्व डोक्यावर नाही तर डोक्यात पाहीजे. तुमची टोपी जर भगवी असेल तर मग आरएसएस ची टोपी काळी का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्या १७६० पिढ्या आल्या तरीही मुंबई स्वतंत्र होणार नाही. कोणीही आले तरी ही मुंबई स्वतंत्र होऊ देणार नाही. बुलेट ट्रेन कशाला हवी आहे. कोणाल हवी आहे. तुम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे. मागे खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, ते देशाची दिशा भरकटवत आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, बाळासाहेबांना देवळात घंटा बडवणारा हिंदू नको होता तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे होता. आपले हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचे घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा. काय मिळालं, घंटा. असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. (CM Uddhav Thackeray Live)

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.