CM Uddhav Thackeray: आमच्यावर टीका करा, राज्याला बदनाम करु नका - मुख्यमंत्री

अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySaam Tv

रश्मी पुराणिक -

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. यावेळी अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या क्षणापासून विरोधकांनी जो गोंधळ घातला त्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला. विरोधक राज्यपालांकडे फक्त तक्रार करण्यासाठी जातात पण, राज्यपालांच्या अभिभाषणावेळी विरोधकांनी जो गोंधळ घातला तो राज्याच्या संस्कृतीला अशोभनीय होता, असं त्यांनी म्हटलं.

मी बोलणार ते तळमळीने बोलणार खोटं बोलता येत नाही. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. त्याचं महत्त्व आमच्यापेक्षा जास्त विरोधकांना माहित आहे. तक्रार करण्यासाठी राज्यातील कोणीही राज्यापालांकडे जाऊ शकतो तो त्यांचा अधिकार आहे. काही अधिकार जसे आपण मानतो, तशा काही प्रथा परंपराही आपण पाळायला हव्या. तुम्ही एखाद्या गोष्टीबाबात आक्षेप घेऊ शकता, विरोध करु शकता, पण, निदान राज्याची संस्कृती, परंपरा आहे. राज्यपालांनी त्यांचं अभिभाषण सुरु केल्यावर जो काही गोंधळ झाला तो राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) विरोधकांना सुनावलं.

CM Uddhav Thackeray
रावणाचा जीव बेंबीत होता तसा काहीजणांचा जीव मुंबईत...; उध्दव ठाकरेंचा भाजपला टोला

राज्यपालांचं (Bhagat Singh Koshyari) ऐकून घ्यायला हवं होत. तेव्हा तुम्ही जो दाऊद उल्लेख केला भाषणात, तो महिनाभर उल्लेख केला. दाऊद एके दाऊद केलं. मला अपेक्षा होती की हक्काने जेव्हा आपण राज्य सरकारबद्दल तक्रार नोंदवता, तेव्हा सरकार काय करतं, त्याचा आढावा राज्यपाल आपल्यापुढे मांडत असतात. ते भाषण होऊ दिलं नाही. ते राष्ट्रगीतालाही थांबू शकले नाही. देशात राज्यपालांचं पहिल्यांदा इतका मोठा अपमान झाला असेल.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातील मुद्दे वाचून दाखवले

समाजसुधारक अनुसरण करतील असं भाषणात होतं. माझ्या शासनाच्या सीमेवर मराठी भाषिक जनतेच्या हक्कासाठी उभे राहण्याचा निर्धार, हे ऐकायला पाहिजे होतं. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अपमानाचा शासन निषेध करते. पलीकडचे राज्य आहे, शासन त्याचं आहे (विरोधकांचं) म्हणून भाषण होऊ दिलं नाही का, असा प्रश्न पडतो.

कोरोनामध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता असताना राज्याने कशा पद्धतीने ऑक्सिजन मिळवला. केंद्राने हजारो किलोमीटर लांबून ऑक्सिजन आणण्याची परवानगी दिली. हे जीवघेणं आहे असं मी पंतप्रधानांना सांगितलं होतं. त्याची हवाई वाहतूक करता येत नाही. रिकामे टँकर इथून एअर लिफ्ट केले आणि तिकडून ऑक्सिजन भरुन रेल्वेने आणले. रात्रंदिवस यंत्रणा कार्यरत होती. ज्याचा मला मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहे. मुख्यमंत्री कोणी असल तरी यंत्रणा तीच ते काम करतात, अनेक योजना ऐकून घेतल्या नाही

राज्य सरकार पर्यावरणाबाबत गांभीर्याने काम करत आहे. स्कॉटलँड इथील परिषदेत महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला. तसे, देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. राज्यपालांना राज्याचा अभिमान वाटतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोव्हिड काळात मोफत शीवभोजन दिले. 8 कोटी पेक्षाअधिक शीवभोजन थाळ्यांचं वितरण झालंय. आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. तो करण्यासाठी शासनाने 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत. लक्ष ठेवा, कारण यातही तुम्हाला भ्रष्टाचार दिसेल. काही लोकांचं असं असतं की आरशात बघितलं तरी भ्रष्टाचार झाला, असं म्हणतात. आरशाच्या मॅन्युफॅक्चरमध्ये भ्रष्टाचार दिसतो, असा टोला त्यांनी लगावला.

माझ्या शस्त्रक्रियेच्या काळात मला सांभाळून घेतलं, मी नसताना माझी उणिव न भासू देता मंत्र्यांनी काम केलं, त्याचे मी आभार मानतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्याची बदनामी केली, हे योग्य नाही - मुख्यमंत्री

सुधीर मुनगंटीवार हे शासन बेडवड्याचे आहे असं म्हणाले. आपल्या महाराष्ट्राला जे छत्रपतींचं राज्य आहे तुम्ही त्याला मद्यराष्ट्र बोललात. हे मद्य वाईन किराणा दुकानात नाही मिळत. जिथे सुपरमार्केट आहे, तिथे हे मिळतं. मध्यप्रदेशची आकडेवारी मी वाचतो, त्याला तुम्ही मद्यप्रदेश म्हणणार का. आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो असं नाही करायचं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना टोला लगावला. देशात मद्य विक्रीची दुकानं सर्वात कमी आहेत. कर्नाटकात ७.१०, मध्यप्रदेशात ५.०७, उत्तर प्रदेश २.६०, तामिळनातू २.४३, तेलंगणा ६.३०. हे सगळं बघितल्यावर लगेच राज्याची बदनामी करायची, हे योग्य नाही. तुम्ही आमच्यावर टीका करा, पण राज्याची बदनामी केली, हे योग्य नाही. टीका करा, किती टोकाला जाऊन करायची.

रावणाचा जीव बेंबीत होता, तर काही जणांना केंद्रात सरकार मिळालं तरी त्यांचा जीव बेंबीत नाही मुंबईत असतो. मुंबई सारखं शहर नाही. मी पक्का मुंबईकर आहे. माझ्या मुंबईत जे करु ते सर्वोत्तम असलं पाहिजे, हा कटाक्ष असतो. मुंबईतील पब्लिक स्कूल चांगले केले. आठ भाषांतून शिक्षण देणाऱ्या शाळा शौचालय उद्घाटन करायची इच्छा असेल कुणाला तर घेऊन जाऊ, मालमत्ता करातून सूट दिली. आरोग्यासाठी योजना, कॅन्सरसाठी योजना, मुंबई मॉडेल जगभरात प्रसिद्ध झालं. पण द्वेषाचं कावीळ बरे होत नाही.

जम्बो कोव्हिड सेंटर सुरु केलं. मला पंतप्रधन म्हणाले, इटलीमध्ये काय सुरु आहे बघ देशात कोणी उभी केली का माहित नाही. काही ठिकाणी नदीत मृतदेह टाकले, आपण असं होऊ दिले नाही. वरळी डेअरी जागतिक दर्जाचे मत्स्यालय प्रस्ताव आहे. अनेक कामं आहेत, आरे जागा पर्याय मागितला, केंद्र सरकार द्यायला तयार नाही. मेट्रो काम बंद नाही, काम सुरुये 10 हजार कोटी वाढीव प्रस्ताव हा सप्टेंबर २०१८ मध्ये होता, तुमच्या काळातील आहे.

कोरोनाशी लढताना केंद्राने राज्यांना मदत दिली. केंद्राने सचिव गट तयार केलं. त्या गटाने आवश्यकता आहे. व्हेंटिलेटर्स चालले नाही पण गरज होती, घेतले त्यांनी गोष्टी पुरवल्या. जीव वाचवणे प्राथमिकता महापालिकेने काम केले एक ही काम टेंडर शिवाय केलं नाही त्याच्या मागे चौकश्या आमचं सरकार यायच्या आधी आठ ते दहावेळा टेंडर काढून रद्द केली. ते टेंडर उघडलं नाही मंजूर नाही. त्यात भ्रष्टाचार कसा झाला? त्याचं पेनड्राईव्ह कसा मिळाला. मंत्र्यांचे राजीनामे मागणार हा अन्याय आहे, जे शक्य आहे कठीण काळत तसा अर्थसंकल्प मांडला. प्रतिमा आणि बदनामी, मी टीकेला, बदनामीला घाबरत नाही. पण, बदनामी करताना कोणत्या थराला जायचं. तुम्ही तथ्यहीन आरोप करणार, इतक्या वेळा बोलायचं की सत्य वाटेल.

नवाब मलिक दाऊद हस्तक संपूर्ण मुंबईत फिरतोय, पाचवेळा निवडून येतोय, मंत्री बनतो, तरी केंद्राच्या यंत्रणेला माहित नाही. नुसते थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे विजवा, हेच करत आहेत का. बाण म्हणजे यंत्रणा झाल्या आहेत. जे बाण हातात घेऊन लक्षावर खुपसलं जातं. देवेंद्र फडणवीस केंद्राने तुम्हाला Raw, सीबीआयमध्ये घेतलं पाहिजे, म्हणजे काम अधिक वेगाने होईल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला.

ईडी आहे की घरगडी कळत नाहीये - मुख्यमंत्री

ईडीकडे इतकी बेकार लोकं आहेत का की त्यांना काहीही माहिती नाही. द्या माहिती आणि मग ईडी याला ठोका त्याला ठोका. म्हणजे माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्ही, चौकशी करणारे तुम्हीच, मग शिक्षाही तुम्हीच करणार. ईडी आहे की घरगडी, हे कळत नाहीये.

दाऊद शूज एजेंसी कोणी घेतली, दाऊद आहे कुठे, एकच विषय निवडणुकीसाठी किती वर्ष घेणार, आधी रामाच्या नावाने मतं, आता दाऊदच्या नावाने मतं घेणार का. गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, दाऊदला फरफटत आणू. आता आपण फरफटत जात आहोत. ओबामा ने ओसामा नावाने मतं मागितली का? ओबामा ने घरात घुसून लादेनला मारलं. दाऊद घरात घुसून मारा, ही मर्दाना हिंमत. नुसते आरोप, आम्ही देशद्रोह्याविरोधात आहोतच. पण, तुम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागता, काश्मीरमध्ये मेहबूब मुफ्ती बरोबर बसलात, अफजल गुरुला फाशी प्रश्न आला. तेव्हा मेहबूब मुफ्ती म्हणाल्या फाशी नको तेव्हा भाजप सत्तेत होते ना? अफजल गुरू देशद्रोही नव्हता? मी कडवट हिंदुत्ववादी आहे, माझे विचार बदलणार नाही सत्तेसाठी आपण काय करायचं, स्वतः ठेवायचं झाकून, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला.

डॉ. लांबे माहीम दर्ग्यात हार घालताना फोटो आहे. हे क्रांतिकारी, फोटो बरोबर असल्याने काही होत नाही. माझे आणि तुमचे फोटो आहेत. डॉ. लांबे नियुक्तीवर विनोद तावडे यांनी हिरव्या शाईने सही केलीये. याने कुणाचे काही होणार नाही. आरोप करून राज्य चालणार नाही. तू किती वाईट आहे हे सांगताना तू किती चांगला आहे? आता जे चाललं आहे. आधी बोलून केल्या जातात.

मर्द असशील, हिंमत असेल, तर समोर येऊन लढा. कुटुंबाला बदनाम करता. नितीन गडकरी म्हणाले होते, आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. तुमच्याकडे ह्युमन लाँड्रिंग आहे का, की बरबटलेला माणूस घ्यायचं, छान अत्तर लावून माणूस साफ होते. हे कोणी बघत नाही. समजत नाही, असं समजू नका. आपल्या पोरांची चाळे बघू न शकणारा वडील धृतराष्ट्र होता. पण, हा महाराष्ट्र आहे. याच्या वाटेला जाऊ नका. यातून कुणाचच काही भलं होणार नाही.

मी येतो, मला तुरुंगात टाका - मुख्यमंत्री

अनेकांना इथे यायचं असतं, इथे संधी आहे. संधीचं सोनं करायचं की माती ते ठरवावं लागेल. आमच्यात काही चुकीचं असेल तर सांगा. तुम्हाला सत्ता पाहिजे ना, त्यासाठी याला अटक करायची, कुटुंबाला त्रास देता. मी सर्वांसमोर सांगतो मी येतो तुमच्यासोबत, सत्तेसाठी नाही. तुम्ही चाळे केले, कुटुंबियांच्या बदनामी केली. मालमत्ता टाचेवर घाबरत नाही. मी येतो, मला तुरुंगात टाका, फुरसदीने आरोप करा. खुलासे करुन उपयोग नाही

ऐकत नाही. एवढंच जीव जळत असेल तर मला तुरुंगात टाका. एक लक्षात ठेवा तुरुंग कोणता, आर्थर नाही, कृष्ण जन्मभुमी त्या तुरुंगात टाका. मी देवकीच्या पहिल्या सात मुलांपैकी असेन, माझी तयारी आहे. मी कृष्णजन्माची वाट पाहीन, असंही ते म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com