शिवसेनेत गद्दारांना जागा नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा

शिवसेनेच्या ५६ वा वर्धापन दिनानिमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई: उद्या विधान परिषदेची निवडणूक (Election) होणार आहे. विधान परिषदेची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज शिवसेनेचा ५६वा वर्धापन दिन झाला. वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या (Shivsena)आमदारांशी संवाद साधला. आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या स्थापनेची आठवण सांगितली. यावेळी त्यांनी 'मी उद्याची निवडणूक जिंकणारच राज्यसभा निवडणुकीत झाले ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचे मत फुटले ते सगळ समोर आले आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, उद्याच्या निवडणुकीसाठी आमदारांना सांगण्याची गरज नाही. आमदारांना एकत्र ठेवणे हीच आजची लोकशाही आहे. आज येथे फक्त आमदाराच नाहीत, हे जवळचे सहकारीही आहेत. आता हॉलमध्ये जेवढे आहेत, तेवढे आमदार पुढच्यावेळी शिवसेनेचे पाहिजे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

कितीही फाटले तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, होय आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. अनेकांनी शिवसेना मोठी केली पण भोगले नाही आपल्याला मिळत, असंही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
ठेकेदार पद्धतीने गुलाम नेमले जातात सैन्य नव्हे; अग्निपथ योजनेवरुन संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

नारळ फोडला त्याचे पाणी माझ्या अंगावर

उभे राहून बोलू शकतो, याअगोदर दाखवले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. माझ्या फादरनेच या पक्षाला जन्म दिला. पितृपक्षाबद्दल अनेक गैर समज माझा पक्ष पितृपक्षच. ५६ वर्षातल्या अनेक गोष्टी ताज्या. जेव्हा शपथ घेतली तेव्हा शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, काका, माँ वेळ काळ न बघता शिवसेनेची (Shivasena) स्थापना. त्या क्षणाचे साक्षीदार माझे वय सहा वर्ष. शिवाजी महाराज की जय म्हणून नारळ फोडला त्याचे पाणी माझ्या अंगावर. फार मोठी जबाबदारी किती मोठी असेल हे तेव्हा काहीच कळले नाही. तुमच्या साथीने आपण अजून पुढे जाऊ. काही आहेत काही निघून गेलेत, त्या सर्वांना अभिवादन.

Uddhav Thackeray
शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या निर्णयाला भूमाता ब्रिगेडचा विरोध

त्या पिढीचे देसाई रावतॆ पहिल्या पिढीचे. शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ साली हेच खूप होते. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत. तुमची जबाबदारी माझी. दोघांनीही रुसवे, फुगवे न करता ऐकले. दोघांत आजही शिवसैनिक जिवंत आहे. त्यांना जी जबाबदारी दिली ती यशस्वी करुन दाखवली. मार्मिक छापायला तयार नसतांना दिवाकर रावतेंनी ते शक्य केले, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

'आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. सगळ आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्या पेक्षा विचाराने भिजू, मी उद्याची निवडणूक जिंकणारच राज्यसभा निवडणुकीत झाल ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचा मत फुटल ते सगळ आलय समोर. कितीही फाटल तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे, असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com