CM; उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) दिल्ली दौऱ्यावर आहेत.
CM; उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
CM; उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वाची बैठकSaam Tv

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) दिल्ली दौऱ्यावर आहेत. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवाई संदर्भात मुख्यमंत्री यांच्या उपस्थित सोमवारी वर्षावर आढावा घेण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात स्वतंत्र बैठक होणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. नक्षलवादी परिसरात रखडलेल्या विकासकामांचा कालच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

हे देखील पहा-

नक्षलवादी कारवाया या ग्रामीण भागातून शहरी भागात वाढत असल्याने केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर अमित शाह यांच्यासोबत सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची चर्चा होते का? याकडेही सर्वांचे लक्ष आहे. दिल्ली दौऱ्यासाठी आज (रविवारी) सकाळीच मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला जाणार आहेत.

CM; उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
लंके म्हणाले, कर्जत-जामखेडची जनता भाग्यवान

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ते बैठकीला हजर राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांची वेगळी भेट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रामधील गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या भागांमध्ये नक्षलवादाची समस्या प्राकर्षाने दिसून येणार आहे.

या भागांमध्ये विकास कामांना गती देण्यास केंद्राचे तसेच राज्याचे प्राधान्य आहे. मात्र, आता नक्षलवादाची समस्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण होऊ शकते, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त करण्यात आली आहे. या गंभीर मुद्द्यावर केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करण्याची गरज असून, पुढील वाटचाल कशी असावी? यासंदर्भात चर्चा करण्याकरिता केंद्राकडून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com