मुख्यमंत्र्यांच्या मानेची शस्त्रक्रिया यशस्वी; २ ते ३ दिवसात मिळणार डिस्चार्ज

वरिष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांच्या टीमने तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी ८:४५ वाजता डॉक्टरांची टीम ऑपरेशन करून बाहेर आली आणि त्यांनी ऑपरेशन यशश्वी झाल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या मानेची शस्त्रक्रिया यशस्वी; २ ते ३ दिवसात मिळणार डिस्चार्ज
मुख्यमंत्र्यांच्या मानेची शस्त्रक्रिया यशस्वी; २ ते ३ दिवसात मिळणार डिस्चार्जSaam Tv

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर सकाळी ७:३० वाजता HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू झाली. वरिष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांच्या टीमने सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी ८:४५ वाजता डॉक्टरांची टीम ऑपरेशन करून बाहेर आली आणि त्यांनी ऑपरेशन यशश्वी झाल्याचं सांगितलं. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑपरेशन थिएटर मध्येच आहेत. पुढील काही वेळ ते भूल दिल्यामुळे विश्रांती घेतील. (CM's neck surgery successful; Discharge will be given only on luck)

हे देखील पहा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास बळावळा होता. त्यामुळे ते मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होत. मागील आठवड्यापासून मुख्यमंत्र्यांना हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे तीन दिवस ऍडमिट होण्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल होते. आता त्यांच्यावर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सध्या २ ते ३ दिवस ते रुग्णालयातच विश्रांती घेतील, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com