CNG Price : तुम्ही CNG कार चालवताय? दर वाढल्यानंतर पुण्यात किती रुपयांना मिळणार? वाचा

गेल्या काही महिन्यांपासून इंधन दर स्थिर होते, पण आता इंधन दरात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
CNG
CNGSaam Tv

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून इंधन दर स्थिर होते, पण आता इंधन दरात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलमध्ये प्रत्येकी ८ पैसे तर सीएनजी (CNG) मध्ये तब्बल ६ रुपयांनी वाढ झाली आहे. राज्य सरकारने पेट्रोल- डिझेलमध्ये कर कमी करुन महिनाही झाला नाही, मात्र त्या आधीच पुन्हा इंधन दरात वाढ झाली आहे. आजपासून पेट्रोल १०५.९१ रुपये तर डिझेल ९२.४३, सीएनजी ९१ रुपयांनी मिळणार आहे, त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. (CNG Price Increases Again Reaches Rs 91 Per Kg In Pune )

आधीच महागाई मुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि खाद्यतेलापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. आता आणखी एक भर पडली आहे. पुन्हा एकदा मुंबईसह पुण्यात सीएनजीचे (CNG) दर वाढले आहेत. नवी दरवाढ आजपासून लागू झाल्याने पुणेकरांना (Mumbai) आता सीएनजीसाठी (CNG) जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

CNG
Mumbai CNG Rate: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; सीएनजी 6 रुपयांनी तर पीएनजी 4 रुपयांनी महाग

मुंबईतही सीएनजीचे दर वाढले

सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात प्रति किलो चार रुपयांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. महिन्याभरातील ही दुसरी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजीचे दर प्रति किलो 86 रुपये तर पीएनजीचे दर प्रति किलो 52. 50 रुपयांवर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शिअल एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले, तर दुसरीकडे सीएनजी (CNG) गॅसच्या दरात वाढ झाल्याची बातमी समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशला लागून असलेल्या राज्यात सीएनजी आणि पीएनजी महाग झाले आहेत.

हे देखील पाहा

नागपुरात पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही सीएनजी महाग

नागपूरमध्ये पेट्रोलपेक्षा सीएनजी महाग झाले आहे. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपूरात विकलं जात आहे. सीएनजीमध्ये ६ रुपयांनी महाग झाले आहे. नागपूरात सीएनजी ११६ रुपये आहे तर पेट्रोल १०६ रुपयांनी मिळत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. सीएनजीच्या दरांतही झपाट्यानं होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com