Breaking News: ठरलं! 'या' तारखेपासून राज्यातील कॉलेज होणार सुरु

कॉलेज सुरू करण्या संदर्भात फाईल मुख्य सचिवांन कडे गेली होती.
Breaking News: ठरलं! 'या' तारखेपासून राज्यातील कॉलेज होणार सुरु
Breaking News: ठरलं! 'या' तारखेपासून राज्यातील कॉलेज होणार सुरुSaam Tv

मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यत बंद असलेले कॉलेज सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यतील वरीष्ठ महाविद्यालयने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम पाळणे गरजेचे आहे. याअगोदर राज्यातील 8 ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यात आले होते.

Breaking News: ठरलं! 'या' तारखेपासून राज्यातील कॉलेज होणार सुरु
न्यायाधीशांना राहण्यासाठी 'लँड्स अ‍ॅन्ड हाऊस'चा पुनर्विकास होणार?

दरम्यान सकाळी माध्यमांशी बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माहिती दिली होती की, कॉलेज सुरू करण्या संदर्भात फाईल मुख्य सचिवांन कडे गेली आहे. काल मिस कम्युनिकेशन झालं असल्याची कबूली उदय सामंत यांनी दिली होती. काल काही अॅटोनॉमस कॉलेज ने आपली कॉलेज सुरू केली आहेत. आज आम्ही कॉलेज सुरू करण्यासंदर्भात सगळे निर्णय घेऊ अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती.

कालच्या अजीत पवारांच्या निर्णयावरुन सरकार मध्ये ताळमेळ आहे का नाही असा प्रश्न उभा राहिला होता. त्यावर उत्तर देताना सामंत म्हणाले ''आमच्यात समन्वय आहे. अजित पवार साहेबांचं माझ्याशी बोलणं झालं आहे. 11 वी आणि 12 वी चे कॉलेज सुरू झाले आहेत. आत्ता आम्ही पदवीधर विद्यार्थ्यांनसाठी कॉलेज सुरू करणार आहोत''.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.