
सिद्धेश म्हात्रे
रस्ते प्रवासादरम्यान वाहनचालकांचे वाद काही नवी नाहीत. वाहन चालकांमधील वादाचे अनेक व्हिडीओ देखील समोर आले आहे. नवी मुंबईतील वाशी येथेही अशी एक घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या NMMT बसला खाजगी वाहनाची मागून धडक लागून अपघात झाला.उरण-कोपरखैरणे बसला वाशी येथे हा अपघात झाला होता. (Latest Marathi News)
या अपघातात खाजगी वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले. यानंतर संतालेल्या वाहन चालकाने तलवार बाहेर काढत बस चालकाला धमकावलं. (Crime News)
वाहन चालकाने तलावार बसवर मारत, शिवीगाळ बस थांबून धरली. पुढील एका गाडीने रस्ता ओलांडत असल्याने अचानक ब्रेक मारल्याने खाजगी कार मागून धडकल्याने हा अपघात झाला. सदर प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात खाजगी वाहन चालक सनी लांबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.