राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल मुस्लिम बांधवांचे अभिनंदन: संदीप देशपांडे

भोंगा Vs चालीसा : राज ठाकरेंनी केलेल्या सामाजिक आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे मुस्लिम बांधवांच अभिनंदन असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
Congratulations to Muslim Brothers for responding to Raj Thackeray's call said Sandeep Deshpande, Sandeep Deshpande Latest Marathi News, MNS News in Marathi
Congratulations to Muslim Brothers for responding to Raj Thackeray's call said Sandeep Deshpande, Sandeep Deshpande Latest Marathi News, MNS News in MarathiSaam Tv

रश्मी पुराणिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसैनिकांना केले होते. त्यानंतर आज अनेक मशिदींमध्ये (Masjid) सकाळची अजान ही भोंग्याविना झाली. याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) मुस्लिम बांधवाचं अभिनंदन केलं आहे. आज मुस्लिम बंधवांनी सहकार्य केले, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) पाठिंबा दिला असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. (Congratulations to Muslim Brothers for responding to Raj Thackeray's call said Sandeep Deshpande)

हे देखील पाहा -

संदीप देशपांडे म्हणाले की, माहीम मशिदीकडे मनसैनिक गेले तिथे अजान वाजली नाही त्यामुळे हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाजली नाही. राज ठाकरेंनी केलेल्या सामाजिक आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे मुस्लिम बांधवांच अभिनंदन असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. (Sandeep Deshpande Latest Marathi News)

४ मे नंतर जर मशिदींवरील भोंग्यावर सरकारकडून कारवाई झाली नाही तर आपण मशिंदीसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनेसकडून सांगण्यात आलं होत. आज मनसेने दिलेला तो अल्टिमेटमची मुदत संपली असल्याने नवी मुंबईमध्ये मात्र मनसैनिक (MNS) आक्रमक झाले असून त्यांनी नेरुळच्या मशिद परिसरात अजान सुरू असतानाच लाऊडस्पीकर्सचा वापर करत मनसेकडून हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं आहे. शिवाय मशिद परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून जय श्रीराम ची घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com