पंतप्रधान नरेंद्र मोदींना सद्बुद्धी दे! काँग्रेसचे विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन आंदोलन

आज पंतप्रधान नरेंद्र माेदी हे देूहनगरीत आले हाेते. त्यापुर्वी काॅंग्रेसने आंदाेलन छेडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सद्बुद्धी दे! काँग्रेसचे विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन आंदोलन
pimpri chinchwad, prime minister narendra modi, dehu, congress.saam tv

पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad news) : आपला देश सध्या महागाई, बेरोजगारी, धार्मिक कट्टरता वाद आणि सीमेवरील चिनी कारवाईने भेडसावत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) हे या प्रश्नाकडे सारखं दुर्लक्ष करून विकासकाम आणि उदघटनाच्या नावावर स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सदबुध्दी मिळावी यासाठी काँग्रेस (congress) कार्यकर्त्यांनी खराडवाडीच्या विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन आंदोलन केले. (congress agitation during prime minister narendra modi visit to dehu)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi in dehu) हे आज देहू (dehu) येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच उद्घाटन समारंभास आले आहेत. देहू गाव जवळ असलेल्या पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) शहरातील खराडवाडी विठ्ठल मंदिरात काँग्रेस पक्षाने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

pimpri chinchwad, prime minister narendra modi, dehu, congress.
सुप्रिया सुळे दिलखूलास... म्हणाल्या, ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव आहेत फर्स्ट क्लास

खराडवाडी येथील विठ्ठल मंदिरात भजन - कीर्तन करून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सद्बुद्धी देण्यासाठी साकड घातले. पंढरपूरचा (pandharpur) विठुराया आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे फक्त वारकऱ्यांनाच नाही तर सर्वांना सदबुद्धी देतात. त्यामुळे तुकाराम महाराज आणि विठ्ठलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना काँग्रेस कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरात भजन- कीर्तन करुन केली.

Edited By : Siddharth Latkar

pimpri chinchwad, prime minister narendra modi, dehu, congress.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वीच पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्त्यांची धरपकड सुरु
pimpri chinchwad, prime minister narendra modi, dehu, congress.
Khelo India : शेवटच्या २० सेकंदात महाराष्ट्राच्या मुलींनी मारली बाजी; खाे-खाे मध्ये दुहेरी मुकूट
pimpri chinchwad, prime minister narendra modi, dehu, congress.
तोपर्यंत जयकुमार गाेरेंना अटक करु नका : मुंबई उच्च न्यायालय

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com