अंबरनाथमध्ये काँग्रेसनं बाईकला दिली फाशी; पेट्रोलचे भाव वाढल्याने केलं प्रतीकात्मक आंदोलन

गेल्या काही दिवसांत पेट्रोलचे भाव शंभर रुपयांच्याही पुढे गेले असून यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल भरणं अक्षरशः अवघड होऊन बसलंय. याच्या विरोधात आज अंबरनाथमध्ये काँग्रेसने चक्क बाईकलाच फाशी देत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
अंबरनाथमध्ये काँग्रेसनं बाईकला दिली फाशी; पेट्रोलचे भाव वाढल्याने केलं प्रतीकात्मक आंदोलन
अंबरनाथमध्ये काँग्रेसनं बाईकला दिली फाशी; पेट्रोलचे भाव वाढल्याने केलं प्रतीकात्मक आंदोलनअजय दुधाणे

अंबरनाथ - गेल्या काही दिवसांत पेट्रोलचे भाव शंभर रुपयांच्याही पुढे गेले petrol hike असून यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल भरणं अक्षरशः अवघड होऊन बसलंय. याच्या विरोधात आज अंबरनाथमध्ये काँग्रेसने चक्क बाईकलाच फाशी देत ambernath congress hangs bike अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील pradip patil यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. Congress hangs bike in Ambernath; The rise in petrol prices was a symbolic agitation

हे देखील पहा -

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल यासह सर्वच इंधनांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. prteol, disel price hike त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल भरण्याच्या नावाने अक्षरशः धडकी भरू लागली आहे. देशात काँग्रेसची सत्ता असताना इंधनाचे भाव थोडे जरी वाढले, तरी भाजपकडून आंदोलनं केली जायची, मात्र आता पेट्रोलचे भाव शंभर रुपयांच्या पुढे गेले असून भाजप 'अबकी बार शंभरी पार' असा अजेंडा agenda राबवत आहे का? असा प्रश्न अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केला. यावेळी काँग्रेस कार्यालयाबाहेर चक्क एका दुचाकीला झाडाला दोरी बांधून फाशी देण्यात आली. तसंच या दुचाकीची अंबरनाथच्या तहसीलदार tahsildar of ambernath कार्यालयापर्यंत हातगाडीवर प्रतिकात्मक अंत्ययात्रा Symbolic funeral काढण्यात आली.

अंबरनाथमध्ये काँग्रेसनं बाईकला दिली फाशी; पेट्रोलचे भाव वाढल्याने केलं प्रतीकात्मक आंदोलन
गुन्हा दाखल होताच भरले वीजचोरीचे देयक; कल्याण पूर्व विभागातील प्रकरण

यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पोहोचून काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात central government मोठी घोषणाबाजी केली. सर्वसामान्यांचं महागाईने कंबरडं मोडलं असून लवकरात लवकर इंधनाचे भाव नियंत्रणात आणावेत, अशी मागणी यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आली. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर महिला कार्यकर्त्यांचीही लक्षणीय उपस्थिती या आंदोलनात होती.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com