काँग्रेसच्या वतीने भिंत दुर्घटना पीडितांना मदत
काँग्रेसच्या वतीने भिंत दुर्घटना पीडितांना मदतजयश्री मोरे

काँग्रेसच्या वतीने भिंत दुर्घटना पीडितांना मदत

18 जुलैला झालेल्या मुसळधार पावसाने चेंबूरच्या भारतनगर परिसरात 8 घरांवर भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 19 जणांचे प्राण गेले होते; तर, पाच जण जखमी झाले होते.

मुंबई - 18 जुलैला पडलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूरच्या भारतनगर परिसरात 8 घरांवर भिंत कोसळली होती. यात 19 जणांचे प्राण गेले तर पाच जण जखमी झाले होते. यानंतर पालिका प्रशासनाने पीडित कुटुंबियांना विष्णूनगर येथे असलेल्या पालिकेच्या इमारातींमध्ये स्थलांतरित केले.

तसेच इतर या घटनेत बाधित इतर परिवारांना देखील याठिकाणी हलवण्यात आले आहे. सध्या पालिकेने त्या इमारतीमध्ये एकूण 37 कुटुंबाना स्थलांतरित केले आहे. झालेल्या भिंत दुर्घटनेत या पीडित कुटुंबियांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील साहित्य वगैरे सर्व काही यात नष्ट झाले.

महापालिकेने राहण्याची व्यवस्था केलेल्या इमारतीमध्ये हे पीडित कुटुंबीय या ठिकाणी फक्त अंगावरच्या कपड्यांसह किंवा अगदी थोडेसे सामान घेऊन या ठिकाणी राहायला आले आहेत. या गोष्टीच्या अनुषंगाने या घटनेत मृतक झालेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना काँग्रेस पक्षाच्या वतीने 25 हजार रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींना 15 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच धान्य व राशनची देखील मदत करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या वतीने भिंत दुर्घटना पीडितांना मदत
पुण्यातील कोंढव्यात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू ; मुंबईमध्ये 24 तासांत घर किंवा भिंत कोसळण्याच्या 14 घटना

केंद्र आणि राज्य शासनाने या कुटुंबियांना 7 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु ती अजून पोहचली नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात काँग्रेसकडून करण्यात आलेली मदत हि या कुटुंबियांसाठी मोलाची आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com