Ayodhya : कॉंग्रेसलाही हिंदुत्वाचे वेध? ठाकरेंनंतर नाना पटोलेही अयोध्येला जाणार!

Nana Patole Will Go In Ayodhya : राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील अयोध्यावारी करणार आहेत.
Ayodhya : कॉंग्रेसलाही हिंदुत्वाचे वेध? ठाकरेंनंतर नाना पटोलेही अयोध्येला जाणार!
Congress leader Nana Patel will go to Ayodhyaसुमित सावंत

मुंबई: अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे भेट देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना प्रभू श्रीरामचंद्राचे (Shree Ram) दर्शन घेण्यासाठी अयोध्येला (Ayodhya) भेट देण्याचे निमंत्रण दिले. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. त्यामुळे राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील अयोध्यावारी करणार आहेत.

हे देखील पाहा -

५ जूनला राज ठाकरेंचा अयोध्या दौरा

राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला अजून बराच वेळ आहे. जून महिन्याच्या पाच तारखेला हा दौरा (Tour) होत असला तरी मनसैनिकांनी आतापासूनच या दौऱ्याचा याचा प्रचार-प्रसार करण्यास सुरूवात केली आहे. राज ठाकरे अयोध्येत जाऊन शक्तीप्रदर्शन करणार आहे. यासाठी मनसेच्या राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यांसाठी रेल्वेचे तिकीट बुक करण्यात येणार आहे. तसेच राज ठाकरेंच्या या दौऱ्याचा प्रचार आणि प्रसार करण्याठी मनसैनिक बरेच कष्ट घेत आहेत. त्यासाठी मुंबईत राज ठाकरेंच्या आगामी अयोध्या दौऱ्यासाठी आतापासूनच बॅनरबाजी करण्यात आली आहे.

१० जूनला आदित्य ठाकरेंचा दौरा

१० जूनला रोजी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या अयोध्या दौऱ्यात अनेक कार्यक्रम असणार आहेत.

१) प्रभू श्री राम जन्मभूमीचे दर्शन

२) हनुमान गढी दर्शन

३) लक्ष्मण किल्ला दर्शन

४) पत्रकार परीषद

५) शरयू नदी महाआरती

अशा प्रकारे आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं स्वरुप असणार आहे. दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेचा अयोध्या दौरा विरुद्धा शिवसेनेचा अयोध्या दौरा असं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळतंय.

राज्यात हिंदुत्वाचं राजकारण तापलं; कॉंग्रेसचीही उडी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज्यातलं राजकारण तापलं आहे. खरे हिंदुत्ववादी आम्हीच आहोत हे दाखव्यासाठी भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यात स्पर्धा लागली आहे. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील जोरदार प्रयत्न करत आहेत. नुकताच त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा समोर आणला. तसेच महाआरती, हनुमान चालीसा पठण यांचंही आयोजन मनसेकडून करण्यात आलंय. याशिवाय राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील येत्या १० जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आता नाना पटोलेंच्या अयोध्या दौऱ्याने कॉंग्रेसलाही हिंदुत्ववादाचे वेध लागले आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. नाना पटोलेंच्या अयोध्या दौऱ्याची तारिख अद्यापतरी ठरलेली नाही. मनसे, शिवसेना कि कॉंग्रेस? यात आता कुणाचा अयोध्या दौरा सर्वात पावरफुल असेल हे येत्या काळातच कळेल.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.