Nana Patole Exclusive : सत्यजित तांबेना काँग्रेसमध्ये 'नो एन्ट्री'? एक जण गेला म्हणून काँग्रेस संपत नाही, नाना पटोले स्पष्टच बोलले

Nana Patole on Satyajeet Tambe: बाळासाहेब थोरात आणि आम्ही एकत्र आहोत.
Nana Patole on Satyajeet Tambe
Nana Patole on Satyajeet TambeSaam Tv

Nana Patole Exclusive : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच्या कलहावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. बाळासाहेब थोरात आणि आम्ही एकत्र आहोत असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मात्र आमदार सत्यजित तांबे यांना काँग्रेसमध्ये परतीच्या वाटा बंद असल्याचे अप्रत्यक्ष संकेत पटोले यांनी दिले. साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे.

बाळासाहेब थोरात आणि आम्ही एकत्र आहोत. राज्यात यावरुन गदारोळ सुरु असताना बाळासाहेब शेजारी बसलेले असताना काँग्रेस एक आहे, असं मी सांगितलं होतं, याची आठवण पटोले यांनी करुन दिली. (Political News)

Nana Patole on Satyajeet Tambe
Pawan Khera Arrest: खोटं सांगून विमानातून उतरवलं आणि अटक केलं, पवन खेडांच्या अटकेनंतर काँग्रेस आक्रमक

सत्यजित तांबेंच्या बंडखोरीवर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, घरातल्या एखाद्या कुणी गडबड केली आणि त्याला बाहेर जायचंच असेल त्याला कुणी थांबवू शकत नाही. आमचा एक नेला आता तिथून ५० आणणार. नाशिक विभागात ४७ आमदार आहे. एक व्यक्ती गेला म्हणून विचार नाही संपला, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

शुभांगी पाटील यांनी ४३ हजार मतं घेतली. मला जनमत कळतं. तिथे काँग्रेसला आता मोठा स्कोप आहे. मी तिथे मेहनत करेल, काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहोचवेल आणि पुन्हा काँग्रेस उभी करेन. एक व्यक्ती गेला म्हणून काँग्रेस संपेल हा विचार मी बदलवून दाखवेल. काँग्रेस विचार जो संपवायला निघेल, तोच संपेल, असं म्हणत नाना पटोले यांनी म्हटलं.

Nana Patole on Satyajeet Tambe
Kapil Sibbal in SC: 'केस जिंकणे किंवा हारणे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही...', असं म्हणत कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद संपवला

आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नसेल. ती निवडणूक आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा बळावर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com