काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर; राहुल गांधींना बिनविरोध पक्षाचं अध्यक्षपद देण्याला बड्या नेत्याचा विरोध

राहुल गांधी यांच्या बिनविरोध काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या ठरावाला पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला आहे.
rahul gandhi
rahul gandhi saam tv

रश्मी पुराणिक

prithviraj chavan news : गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या (Congress) अध्यक्ष पदाच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना काँग्रेस अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या बिनविरोध काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या ठरावाला पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

rahul gandhi
काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या हालचालींना वेग; 'हा' चर्चेतला नेता सोनिया गांधींच्या भेटीला

राहुल गांधी यांच्या बिनविरोध काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या ठरावाला पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला आहे. राहुल गांधी यांच्या प्रस्तावाला पृथ्वीराज चव्हाण यांनी आजच्या बैठकीत समर्थन दिलेच नाही. नाना पटोले यांनी राहुल गांधी बिनविरोध काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे हा प्रस्ताव मांडला.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यावेळी उपस्थित इतरांनी देखील हात वर करून समर्थन दिले. पण त्यावेळी उपस्थित पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र हात वर केला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका ही काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी आणि राहुल गांधी यांनी निवडणुकीत भाग घ्यावा ही आहे. त्यामुळे बिनविरोध निवडीला निवडीला पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध आहे.

rahul gandhi
राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर

दरम्यान, विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला सर्व प्रादेशिक लोकप्रतिनिधींनी एकमताने मंजुरी दिली होती. आज १९ सप्टेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित राज्य प्रतिनिधींची बैठक झाली.

या बैठकीला राज्य निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते. याच महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रस्तावाला काँग्रेसचे वरीष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com