Priyanka Gandhi : ...म्हणून प्रियांका गांधी मुंबईत आल्यात; राजकीय चर्चांना उधाण

आज अचानक प्रियांका गांधी मुंबईत दाखल झाल्या.
Priyanka Gandhi : ...म्हणून प्रियांका गांधी मुंबईत आल्यात; राजकीय चर्चांना उधाण
Priyanka Gandhi News, Maharashtra Political Crisis, Mumbai, Eknath Shinde Latest Newssaam tv

मुंबई : महाराष्ट्रातील (maharashtra) राजकीय वातावरण तापले असतानाच काॅंग्रेसच्या नेत्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आज (गुरुवार) मुंबईत (mumbai) दाखल झाल्या आहेत. दरम्यान प्रियांका गांधी यांचा हा वैयक्तिक दाैरा असल्याचे वेगवेगळ्या माध्यमातून सांगितले जात असले तरी गांधी या राजकीय विशेषत: काॅंग्रेस (Congress) पक्षातील नेत्यांशी चर्चा करतील असा अंदाज बांधला जात आहे. (Priyanka Gandhi Latest Marathi News)

दरम्यान एकीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) या निवासस्थानी नुकतीच आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मविआचे सरकार टिकावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत. त्यांना सर्वांनी सहकार्य करावे अशी सूचना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचे नमूद केले.

Priyanka Gandhi News, Maharashtra Political Crisis, Mumbai, Eknath Shinde Latest News
बंडखाेरांना धडा शिकविण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल; पाच वर्षांची बंदी घालण्याची मागणी

दरम्यान माध्यमांशी बोलताना बुधवारी नाना पटोले यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सध्याच्या संकटाचा सामना करीत आहे. विधानसभा बरखास्त करण्याची काेणतीही शिफारस करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले हाेते. आजच्या गांधी यांच्या दाै-याबाबत काॅंग्रेसकडून सध्या तरी काही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दूसरीकडे महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी मुंबईत आल्या असल्या तरी त्या मालदिवला जाणार असल्याचे वृत्त काही माध्यमांतून देण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Priyanka Gandhi News, Maharashtra Political Crisis, Mumbai, Eknath Shinde Latest News
Earthquake In Karnataka : कर्नाटकात भूकंप; घाबरुन घराबाहेर पडले नागरिक
Priyanka Gandhi News, Maharashtra Political Crisis, Mumbai, Eknath Shinde Latest News
व्हय की, ताेंड लपवणारा आमदार आपलाच ! एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ व्हायरल; गावात चर्चाच चर्चा
Priyanka Gandhi News, Maharashtra Political Crisis, Mumbai, Eknath Shinde Latest News
साता-याच्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उदयनराजेंची दिल्लीतून प्रतिक्रिया, म्हणाले...!

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com