शिंदे - फडणवीस सरकारने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे का? नाना पटोलेंचा संतप्त सवाल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर केलेल्या दाव्यावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
nana patole and shinde Government
nana patole and shinde Government saam tv

रश्मी पुराणिक

Nana Patole On Shinde Government : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर केलेल्या दाव्यावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'शिंदे-फडणवीस सरकारने आधी राज्यातील महत्वाचे प्रकल्प भाजपशासित गुजरात व मध्य प्रदेशच्या घशात घातले. आता कर्नाटकने महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगणे हे महाराष्ट्राची चोहोबाजूनी गळचेपी करणारे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

nana patole and shinde Government
गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिंदे-फडणवीस सरकार व्यस्त; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, 'महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट व जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकने हक्क सांगावा हे हास्यास्पद असून कर्नाटकच्या भाजप सरकारचा हा आगाऊपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. कर्नाटक सीमा वाद अद्याप न्यायप्रविष्ट असताना अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगणे चुकीचे आहे'.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली. 'बेळगाव, कारवार, निपाणीचा प्रश्न अजून सुटलेला नसताना सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील ४० गावांवर हक्क सांगून कर्नाटकने कुरापत काढली आहे. सीमावादाचा मुद्दा सुप्रिम कोर्टात असताना भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे, असे पटोले म्हणाले.

'महाराष्ट्रात पाच महिन्यापूर्वी आलेले शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत मोठा अडथळा आणणारे आहे. राज्यात गुंतवणूक होत असलेले मोठे प्रकल्प गुजरात व मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांना आंदण दिले, तर राज्यातील पाणीही गुजरातला दिले. महत्वाची कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली आता कर्नाटक महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगू लागला आहे, हे राज्यातील सरकार कमजोर असल्यानेच होत आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

'दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या शिंदे-फडणवीस यांना सरकार चालवता येत नसून त्यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे, असेही पटोले म्हणाले.

'भाजपचे नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटक वादाचे खापर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर फोडून आपल्या सुमार बुद्धीचे दर्शन घडवले आहे. सर्व गोष्टींना काँग्रेस व पंडित जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरून भाजप आपले अपयश व नाकर्तेपणा झाकत आहे, अशी टीका पटोले यांनी मंत्री मुनगंटीवार यांच्यावर केली.

nana patole and shinde Government
केंद्राने पाठवलेल्या सॅम्पलला पुन्हा वृद्धाश्रमात पाठवा; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा जोरदार घणाघात

'सरकार म्हणून भाजप कशाचीही जबाबदारी घेत नाही फक्त वादग्रस्त मुद्दे उकरून काढून जनतेची दिशाभूल करत आहे. जनतेचे मुलभूत प्रश्न हे सरकार सोडवू शकत नाही म्हणूनच असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. भाजपचे हे प्रताप जनतेला आता चांगलेच समजतात पण त्यांचा हा कुटील हेतू साध्य होणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com