काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उभा केल्याने अर्थातच शिवसेनेच्या भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
अस्लम शेख- Saam Tv

मुंबई : नियोजित 16 ऑक्सिजन प्लँट Oxygen Plant तयार होत नाहीत त्याआधीच मुंबई महापालिकेने BMC हायवे कस्ट्रक्शन या कंपनीला ऑक्सिजन जनरेटर बसविण्याचे काम दिले आहे. भायखळा Byculla प्राणिसंग्रहालयात पेंग्विन Penguin संलग्न प्रकल्पात दंड आकारल्या गेलेल्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट देण्याचा घाट घातला जात असल्याचा आता थेट आरोप पालकमंत्री अस्लम शेख Aslam Shaikh यांनी केला आहे. Congress Minister Aslam Shaikh allegation on Shivsena

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना पत्र पाठवून या प्रकरणी 320 कोटी रुपयांची फिक्सिंग होत आपल्याचा आरोप ही अस्लम शेख यांनी पत्रात केला आहे.मूळ किमती पेक्षा अधिक पैसे दिले हायवे कस्ट्रक्शन या कंपनीला दिले जात आहेत. यात फिक्सिंग होत असून आयुक्तांनी याची सखोल चौकशी करावी अशी मागणी अस्लम शेख यांनी केलीय.

हे देखिल पहा

दरम्यान भाजप ने अस्लम शेख यांनी कोट्यवधी रुपयांच्या या फिक्सिंग प्रकरणी अँटी कारप्शनकडे तक्रार करावी अशी टीका करत ऑक्सिजन प्लँट मध्ये शिवसेना मनी प्लँट लावू पाहत आहे असा टोला लगावला आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com