Nana Patole News| भाजप आधी चिवडा पार्टी होती, आता...; नाना पटोलेंचा घणाघात

भाजप आधी चिवडा पार्टी होती आणि आता बिर्याणी पार्टी झाली आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
nana Patole
nana Patole saam tv

सचिन जाधव

Nana Patole News : 'इंग्रजांचं देशात राज्य होतं त्यावेळी जे इंग्रजांनी केलं, तेच आता सुरू आहे. भाजप सरकार इंग्रजांसारखं आणि हुकूमशहा सारखं वागत आहे. भाजप आधी चिवडा पार्टी होती आणि आता बिर्याणी पार्टी झाली आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

nana Patole
विनायक मेटेंचा अपघात की घातपात ? शिवसेना खासदाराने केली 'ही' मागणी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून घरोघरी तिरंगा अभियान सुरू आहे. तर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज पुण्यात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेतील सभेतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला.

नाना पटोले पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीत आपण हा अमृत महोत्सव करत आहोत. कारण लोकमान्य टिळक यांनी जो नारा दिला होता, 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे' आज तोच नारा देण्याची वेळ आली आहे. आपल्या देशाला पुन्हा एकदा स्वातंत्र्याची गरज आहे'.

नाना पटोले पुढे म्हणाले, 'देशाच्या स्वातंत्र्यात ज्यांचा काही वाटा नाही, असे लोक देशात सत्तेवर आले आहेत. त्यांनी संविधानाचं महत्व संपवण्याचे काम सुरू केलं आहे. या पदयात्रेच्या भर सभेत नाना पटोले यांनी एका वारकऱ्यांचा भाजप विरोधाचा व्हिडीओ लावून दाखवला. तर आज वारकरी आणि माळकरी देखील सांगत आहेत. भाजपचा विरोधात बोलल्यावर तुमच्या मागे ईडी सीबीआय लागते. त्याचसोबत गोरगरीब लोकांकडून पैसा वसूल करून मुख्य चार-पाच लोकांना वाटण्याचे काम भाजप करत आहे'.

nana Patole
विविध असूनही एक कसे राहायचे, जगाने भारताकडून शिकले पाहिजे : सरसंघचालक मोहन भागवत

'देशाची परिस्थिती हालाखीची करण्याचं पाप भाजपने केले . 'कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला मारलं' अशी भावना गोरगरीब जनता व्यक्त करत आहेत. नरेंद्र मोदी हे जगातील पहिले नेते आहेत, जे आपल्या देशात दुसऱ्या देशातील प्रमुखांचा प्रचार करतात. पंतप्रधान मोदी तुमच्या 'नमस्ते ट्रम्प'मुळे देशात कोरोना विषाणू आला. देशातील अनेक डॉक्टरांनी सांगितले की, थाळ्या वाजवून आणि दिवे लावून कुठलीही महामारी कमी होत नाही. आमच्या लहानपणी माझी आई सांगायची थाळी वाजवू नकोस, औदासा येईल आणि पंतप्रधान मोदींनी देशात थाळी वाजवून औदासाच आणली, अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर घणाघात केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com