गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी ईडीची कारवाई; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडीने चौकशी केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना आक्रमक भूमिका घेतली आहे.
गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी ईडीची कारवाई; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
Nana Patole Saam TV

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडीने चौकशी केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.

'गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे, काँग्रेस पक्ष अशा दडपशाहीला घाबरत नाही. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून भाजपने दिल्लीत काँग्रेसचे नेते, खासदार, पदाधिकारी यांच्यावर अत्याचार चालवला आहे. पण ब्रिटीश सत्तेला नामोहरम करून पळून लावणारा काँग्रेस पक्ष इंग्रजांच्या हस्तकांच्या या दडपशाहीला भीक घालणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ( Nana Patole News In Marathi)

Nana Patole
इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी आडनाव गृहित धरणे चुकीचे : नाना पटोले

गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले यांनी राहुल गांधींवर ईडीने केलेल्या चौकशीवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली. तसेच उद्या दिनांक १६ जून रोजी राजभवनसमोर आणि १७ तारखेला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की,'देशात अत्यंत भयानक परिस्थिती आहे. सुडाने पेटून उठलेल्या भारतीय जनता पक्षाचे सरकार दिल्लीत सत्याग्रहासाठी आलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार यांच्यावरही हल्ले करत आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घुसून तेथील नेत्यांनाही मारहाण करण्यात आली. इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात आहे परंतु काँग्रेस पक्ष बलाढ्य अशा इंग्रज सत्तेला घाबरला नाही,उलट त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. तेव्हा ब्रिटिंशाविरोधात लढलो आता ब्रिटिशांच्या हस्तकांविरोधात लढत आहोत, आम्ही यांना घाबरत नाही'.

Nana Patole
शरद पवारांनीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी; शिवसेनेचा आग्रह

पत्रकार परिषदेनंतर नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी रिगल सिनेमाजवळ रस्त्यावर उतरून आंदोलन करून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारविरोधातील काँग्रेसचे हे आंदोलन सुरुच राहणार असून गुरुवारी राजभवनावर आंदोलन करणार आहे तर शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी आंदोलन करणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com