Nana Patole: निवडणुका स्वबळावर लढल्या, जनतेच्या आशीर्वादामुळे यश मिळाले - नाना पटोले

निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला त्यात हा निकाल लागला आहे.
Nana Patole: निवडणुका स्वबळावर लढल्या, जनतेच्या आशीर्वादामुळे यश मिळाले - नाना पटोले
nana patoleSaam TV

मुंबई : चंद्रकांतदादा पाटील बरोबर बोलतात. त्यांचा पक्ष सर्वात मोठा आहे. देश विकायलाही भाजप मोठा पक्ष आहे, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांवर घणाघात केला आहे. तसेच, त्यांनी आजच्या निवडणुकांच्या निकालाबाबत महाराष्ट्रातील जनतेचे आभारही मानले. निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला त्यात हा निकाल लागला आहे. जनतेने जो कौल दिला त्याबद्दल आम्ही जनतेचे आभारी आहोत, असंही ते म्हणाले (Congress state president Nana Patole On Nagar Panchayat Elections Results 2022).

nana patole
Nagar Panchayat Elections 2022 Result: नारायण राणेंच्या बालेकिल्यात सेनेस ७ जागा

"महाराष्ट्रात विदर्भात काँग्रेस पुढे आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही काही ठिकाणी पुढे आहोत. कोकणमध्येही आम्ही खाते उघडले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांनी काम केले. जनतेच्या आशीर्वादामुळे यश मिळाले. भंडारा निकाल अजून मिळायचे आहेत".

"निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला त्यात हा निकाल लागला आहे. अनेक ठिकाणी जागा वाटपात गोंधळ होऊ नये, यासाठी स्वबळावर आम्ही निवडणूक लढलो. राज्यात जनतेने महाविकास आघाडीला पसंती दर्शवली आहे. मला राष्ट्रवादी किंवा कोणावर आरोप करायचा नाही. आम्ही अनेक भागात वाढलो आहोत", असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

nana patole
Nagar Panchayat Election: बहिष्कारामुळं 'या' नगरपंचायतीसाठी मतदानच झालं नाही; ६ उमेदवार आले निवडून बिनविराेध

"ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत. कोर्टाच्या आदेशानंतर आयोगाने इम्पिरिकल डेटा तयार केला जाणार आहे. तिसरी लाट आली, म्हणून शासकीय कामकाज अडथळा आला म्हणून इम्पिरिकल डेटा फास्ट ट्रॅकवर तयार करता आला नाही", अशी माहिती त्यांनी दिली.

नाना पटोलेंची भाजपवर टीका

"चंद्रकांतदादा पाटील बरोबर बोलतात. त्यांचा पक्ष सर्वात मोठा आहे. देश विकायलाही भाजप मोठा पक्ष आहे. पट्टी डोळ्याला बांधून भाजप बोलत आहे", अशी घणाघाती टीकाही त्यांनी भाजपवर केली.

गोव्यात काँग्रेसची सत्ताच येईल

"काँग्रेसची सत्ताच गोव्यात येईल. मला कोणाची ताकद काढायची नाही. बहुमताचे सरकार काँग्रेसचे बनत असेल तर आघाडी का करु? प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करायचा अधिकार आहे. जनतेने जो कौल दिला त्याबद्दल आम्ही जनतेचे आभारी आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक या विधानसभा, लोकसभा निवडणुकापेक्षा वेगळ्या असतात", असंही पटोले म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.