
Nana Patole On Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राज्यपालांनी इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपालांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यपालांवर टीका केली. 'राज्यपाल यांनी संविधानिक व्यवस्थेचं रक्षण करायला हवं, राज्यपाल ते ने करता भाजपच्या कार्यकर्त्या सारखे वागतात. राज्यपालांना हटवावे अशी मागणी आम्ही काँग्रेसच्या वतीने अनेकदा केली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान यांना त्याबद्दल पत्र देखील पाठवले आहे. महापुरुषांचा अपमना करणारे राज्यपाल यांना भाजपला ठेवायचं आहे, हे आपण पाहतोय. त्यामुळे राज्यपालांना पदावरून हटवले पाहिजे.
दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, 'राज्यपाल भवन हे भाजप भवन झालं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे भाजपला फायदा होईल असं काम राज्यपाल काम करत होते. अनेक वक्तव्य त्यांनी फुले दाम्पत्यावर केले आहे. त्यांच्या मनातलं पाप कृतीतून व्यक्त होतं. राज्यपालांच्या मताशी भाजप सहमत होतं. त्यामुळे राज्यपालांची हकालपट्टी झाली पाहिजे'
राज्यपालांच्या इच्छेवर सरकार विचार करेल - जयंत पाटील
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील म्हणाले, 'काही प्रक्रिया बाकी असेल किंवा त्यांना नवीन राज्यपाल बदलण्यासाठी माणूस मिळाला नसेल. राज्यपालांनी जी वक्तव्य केली, ती वक्तव्य बघून महाराष्ट्राने देखील महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी इच्छा तोंडी आमच्या कडे व्यक्त केली होती. त्यांनी लेखी इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे सरकार यावर विचार करेल'.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.