Nana Patole : PM मोदी ओबीसी नाहीत, लवकरच पुरावे देऊ; नाना पटोलेंचं मोठं विधान

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा आरोप केलाय.
Nana Patole vs PM Narendra Modi
Nana Patole vs PM Narendra ModiSaam TV

Nana Patole On PM Narendra Modi : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठा आरोप केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाही, ते अप्पर समाजाचे आहेत. भाजप त्यांना ओबीसी म्हणून प्रोजेक्ट करत आहे. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजपचा (BJP) ओबीसीची मतं मिळवण्याचा हा मोठा प्रयत्न असून मोदी ओबीसी नाहीत याचे लवकरच पुरावे देऊ, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. (Nana Patole News Today)

Nana Patole vs PM Narendra Modi
Sharad Pawar | एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात : शरद पवार

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी भाजपवर विविध आरोप केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे ओबीसी नसल्याचाही आरोप केलाय. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत, आम्ही ते उघड करणारच आहोत', असं मोठं विधानही पटोले यांनी केलं आहे. (Nana Patole vs Narendra Modi)

काय म्हणाले नाना पटोले?

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाही, ते अप्पर समाजाचे आहेत. भाजप त्यांना ओबीसी म्हणून प्रोजेक्ट करत आहे. बाठीया आयोगाच्या माध्यमातून ३८% ओबीसी आहे असं चित्र आडनावाच्या माध्यमातून त्यांनी तयार केलं. अशा पद्धतीने ते करणे चुकीचे. त्यासंदर्भातील सगळे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. हे पुरावे लवकरच जनतेपुढे आणू', असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. (PM Narendra Modi News)

Nana Patole vs PM Narendra Modi
आदित्य ठाकरेंच्या १०० खोक्यांची पोलखोल करू; शिंदे गटातील नेत्याचा इशारा

इतकंच नाही तर 'आम्ही ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने आडनावावरुन माहिती संग्रहित केली होती. मात्र आडनावावरून जात समजत नाही. एकाच आडनावाचे लोक अनेक जातींमध्ये असू शकतात. त्यामुळेच मोदी हे ओबीसी नाहीत'. असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोलेंचं डोकं फिरलेलं आहे : प्रसाद लाड

दरम्यान, नाना पटोले यांच्या या विधानावरून आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे. नाना पटोले यांचे डोकं फिरलेलं आहे, नरेंद्र मोदी हे गुजरात मधील तेली समाजाचे आहेत त्यांनी ओबीसी समाजासाठी काय केलं हे संपूर्ण देश जाणतो, सबका साथ सबका विकास हा मोदीजींचा आतापर्यंत अजेंडा राहिला आहे. असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com