चंद्रकांत हंडोरे कधीच काँग्रेस सोडणार नाहीत : नाना पटोले

पटोले यांनी हंडोरे आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संवाद साधताना नाना पटोले यांनी त्या आमदारांवर कारवाई केली जाणार, असे आश्वासन हंडोरे समर्थकांना दिले.
nana patole
nana patole saam tv

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांनी आज चेंबूर मध्ये भीमशक्ती संघटनेचा मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केले. या मेळाव्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेत झालेल्या हंडोरे यांच्या पराभवाबाबत काँग्रेसवर जोरदार टीका केली. यामुळे हंडोरे हे काँग्रेस सोडणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. याची माहिती मिळताच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तात्काळ या बैठक स्थळी धाव घेतली. त्यावेळी पटोले यांनी हंडोरे आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संवाद साधताना नाना पटोले (Nana Patole) यांनी त्या आमदारांवर कारवाई केली जाणार, असे आश्वासन हंडोरे समर्थकांना दिले. (Nana Patole News )

nana patole
'शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, तर भाजप...'; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

भीमशक्ती संघटनेच्या मेळाव्यात पटोले म्हणाले, 'चंद्रकांत हंडोरे कधीच काँग्रेस सोडणार नाहीत. हंडोरे यांच्या पराभवाचे मलाही दु:ख झाले. याबाबत कारवाई केली जाणार आहे. तसेच आपण अध्यक्ष असतो तर हे सरकार पडले नसते, त्यावेळी जे तिथे होते त्यांनी हे करायला हवे होते'. तर या मेळाव्यात हंडोरे आपण पक्ष सोडत नसल्याचे या वेळी जाहीर केले.त्याचबरोबर त्यांनी पक्षाची शिस्त न पाळणाऱ्यावर ताशेरे ओढले'.

nana patole
सेनेचे आणखी ३ खासदार शिंदे गटात सामील होणार ? केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा

'त्या' आमदारांवर कारवाई झाली नाही तर... ; चंद्रकांत हंडोरेंनी दिला होता काँग्रेसला इशारा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि मुंबईचे प्रभारी माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचे आज चेंबूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. हंडोरे हे ज्या भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्या संघटनेची चेंबूर (Chembur) येथे चिंतन शिबिर होतं. या वेळी बोलताना हंडोरे यांनी काँग्रेस पक्षाबाबत एक सूचक वक्तव्य केलं होतं.

क्रॉस वोटिंग करणाऱ्यावर कारवाई झाली नाही तर पक्षाबाबतचा निर्णय घेऊ असा इशारा हंडोरे यांनी यावेळी बोलताना पक्षाला दिला. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये (Legislative Council) चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता, तर भाई जगताप (Bhai Jagtap) विजयी झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com