कॉंग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; भाई जगतापांची तक्रार थेट सोनिया गांधीकडे

युवक कॉंग्रेसचे मंबई अध्यक्ष आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी भाई जगताप यांच्या विरोधात थेट सोनिया गांधीकडे तक्रार केली आहे.
कॉंग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; भाई जगतापांची तक्रार थेट सोनिया गांधीकडे
कॉंग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; भाई जगतापांची तक्रार थेट सोनिया गांधीकडेSaam Tv

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: कॉंग्रेस पक्षात सारं काही अलबेल नाही हे अनेकदा उघड झालंय. मुंबई कॉंग्रेसमधील मतभेत आणि अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. विलेपार्ले पुर्व विधानसभेचे आमदार तथा युवक कॉंग्रेसचे मंबई अध्यक्ष झिशान सिद्दिकी यांनी भाई जगताप यांच्या विरोधात थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधीकडे लिखीत तक्रार केली आहे. मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळातून आपलं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आलं असून, जेव्हा आपण शिष्टमंडळात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपला जाहीर अपमान केला अशी तक्रार त्यांनी केली आहे. (Congress's internal dispute resurfaces; Bhai Jagtap's complaint directly to Sonia Gandhi)

हे देखील पहा -

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर आमदार झिशान सिद्दिकी यांनी गंभीर आरोप केले आहे. सिद्दिकी यांनी आपल्या पत्रात लिहिलं की, "मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळातून आपलं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आलं, जेव्हा आपण शिष्टमंडळात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपला जाहीर अपमान केला. एवढचं नाही तर, "आमदार असो कोणी असो इथून चालता हो" अशी भाषा भाई जगताप यांनी वापरली. आपण याबाबत तिथेच भाई जगताप यांना विचारणा केली असता आपला पुन्हा अपमान केल्याचं पत्रात म्हटलं आहे. मी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष असताना चारचौघात माझा अपमान केला असंही सिद्दिकी म्हणाले.

कॉंग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; भाई जगतापांची तक्रार थेट सोनिया गांधीकडे
राज्याचं हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार

एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यात महाविकास आघाडी सोबत लढणार की वेगळे लढणार याबाबत कार्यकर्त्यांनमध्येही संभ्रम आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अनेकदा आक्रमक होत आपल्याच मित्र पक्षांवर निशाणा साधतायत, आणि त्यात आता हे पक्षांतर्गत वाद. यामुळे कॉंग्रेसला पक्षांगतर्गत वाद लवकरात लवकर सोडवण्याची गरज आहे, अन्यथा दोघांचे भांडण अन् तिसऱ्याचा लाभ ही म्हण खरी ठरेल असे दिसते.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com