'या' कारणामुळे आमदार रवी राणा यांची आजची रात्रही तुरुंगातच; उद्या होणार सुटका

न्यायालयाच्या आदेशाची प्रत ५:३० वाजेपर्यंत जेलमध्ये आली नाही, त्यामुळे त्यांची आजची रात्रही जेलमध्ये जाणार आहे.
'या' कारणामुळे आमदार रवी राणा यांची आजची रात्रही तुरुंगातच; उद्या होणार सुटका
Navneet Rana and Ravi Rana latest News UpdateSAAM TV

मुंबई: हनुमान चालीसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. गेल्या अकरा दिवसांपासून राणा दाम्पत्य कोठडीत होते. न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. अटी-शर्तींचे उल्लंघन झाले तर, जामीन रद्द होईल, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. पण राणा दाम्पत्याची तुरुंगातून आज सुटका होणार नाही. त्यांची आजचीही रात्र जेलमध्ये जाणार आहे. (Navneet Rana News)

Navneet Rana and Ravi Rana latest News Update
Ravi-Navneet Rana : मुंबई सत्र न्यायालयाकडून रवी आणि नवनीत राणा यांना जामीन मंजूर | SAAM TV

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. पण न्यायालयाच्या आदेशाची प्रत ५:३० वाजेपर्यंत जेलमध्ये आली नाही, त्यामुळे त्यांची आजची रात्रही जेलमध्ये जाणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता रवी राणा यांची सुटका होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

राज्यात लाउडस्पीकरवरून वाद सुरू होता. त्याचवेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा (Ravi Rana) हे मुंबईत आले होते. यावरून शिवसैनिकही आक्रमक झाले होते. त्यांनी मातोश्रीबाहेर कडा पहारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी राणा यांच्या मुंबईतील घराबाहेर निदर्शने केली होती. तसेच पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.