Pune: कोरोनामुळे गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक; पालिकेच्या विश्लेषणातून माहिती समोर

Covid Positive Pregnant Womens In Pune: या 10 महिन्यांत 96 माता मृत्यूंची नोंद झालीय, यापैकी 83 मृत्यूंच्या कारणांचे विश्लेषण करण्यात आले, त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय.
Corona causes higher mortality in pregnant women; In front of the information from the analysis of the municipality
Corona causes higher mortality in pregnant women; In front of the information from the analysis of the municipalitySaam Tv

पुणे: कोरोनामुळे गर्भवती महिलांच्या (Pregnant Women) मृत्यूची संख्या अधिक आहे, गेल्या 10 महिन्यात पुण्यात जवळपास 96 घटनांची नोंद झालीय. नुकतंच पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) यासंदर्भात विश्लेषण करण्यात आले आहे. पुणे शहरात प्रसूतीनंतर आई झालेल्या काही वेळातच ज्या महिलांचा मृत्यू झालाय त्याला कोरोना (Covid-19) हे महत्वाचे कारण ठरले आहे. गेल्या वर्षी जानेवारीपासून ते या वर्षी एप्रिलपर्यंत कोरोनामुळे 31 टक्के मातामृत्यूंची नोंद (Deaths) महापालिकेत झालीय. या 10 महिन्यांत 96 माता मृत्यूंची नोंद झालीय, यापैकी 83 मृत्यूंच्या कारणांचे विश्लेषण करण्यात आले, त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. (Corona causes higher mortality in pregnant women; In front of the information from the analysis of the municipality)

हे देखील पहा -

Corona causes higher mortality in pregnant women; In front of the information from the analysis of the municipality
Ajit Pawar: अजित पवारांविरोधात फेसबुकवर बदनामीकारक लिखाण, वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा

गेल्या वर्षी जानेवारीपासून ते या वर्षी एप्रिल पर्यंत कोरोनामुळे 31 टक्के मातामृत्यू नोंद महापालिकेत झालीय.19 टक्के माता मृत्यू मागे इतर वैद्यकीय कारणे होती, तर 14 टक्के मृत्यू हे स्पेप्सीसमुळे (इतर संसर्ग) झाले असल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे अशी माहिती पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी वैशाली जाधव यांनी दिली आहे.

पुणे महापालिकेने माता मृत्यूंचे केलेले विश्लेषण:

गर्भधारणा, प्रसूतीमध्ये किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसांत गर्भधारणेशी संबंधित कारणांमुळे झालेला मृत्यू म्हणजे माता मृत्यू.

- कोरोनामुळे झालेले मृत्यू: 31 टक्के

- न्याय वैद्यकीय कारणांमुळे झालेले मृत्यू: 19 टक्के

- इतर कारणे: 18 टक्के

- सेप्सीस: 14 टक्के

- गर्भधारणेतील उच्च रक्तदाब: 10 टक्के

- न्यूमोनिया: 5 टक्के

- प्रसूती पश्चात रक्तस्राव: 3 टक्के

एकूणच पाहता गेल्या वर्षी जानेवारीपासून ते या वर्षी एप्रिल पर्यंत कोरोनामुळे 31 टक्के मातामृत्यूंची नोंद महापालिकेत झाली आहे, त्यांमुळे कोरोनापासून गर्भवती महिलांची (Pregnant Womens) विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com