Corona : पुणे जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक!

पुणे जिल्ह्याचा साप्ताहिक कोरोनाबाधित दर ६.३३ टक्के असून राज्यात सर्वाधिक आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा उद्रेक टाळायचा असेल तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे.
Corona : पुणे जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक!
Corona : पुणे जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक!Saam tv

पुणे : पुणे जिल्ह्याचा साप्ताहिक कोरोनाबाधित दर (पॉझिटिव्हिटी रेट) राज्यात सर्वाधिक असून सद्यःस्थितीत जिल्ह्याचा कोरोनाबाधित दर ६.३३ टक्के एवढा आहे. याउलट राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ २.६७ टक्के एवढा आहे. हा पॉझिटिव्हिटी रेट पाहता, पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा धोका अजूनही टळला नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांनी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची व अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

हे देखील पहा :

आज घडीला राज्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी २५.८९ टक्के रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात असल्याचे राज्य आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात नमूद आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ३१ ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या आठवड्यातील राज्यातील कोरोना रुग्णांचा आढावा मांडणारा साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात या आठवड्यातील राज्यातील जिल्हानिहाय सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या, तसेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्ण संख्या, कोरोना बाधितांचा जिल्हानिहाय साप्ताहिक सरासरी दर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Corona : पुणे जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक!
SPPU : NIRF च्या टॉप-10 रँकिंग मधून पुणे विद्यापीठ गायब!

या आठवड्यामध्ये राज्यात ४७ हजार ६९५ सक्रिय कोरोना रुग्ण होते. तर एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये एकूण १२ हजार ४०९ रुग्ण होते. गेल्या तीन दिवसात रुग्णांची ही संख्या २ हजार ४७० ने कमी झाली असून सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण ९ हजार ९३९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यात अनुक्रमे सर्वाधिक कोरोनाबाधित दरांमध्ये पुणे जिल्हा ६.३३ टक्के दरासह पहिल्या, सांगली जिल्हा ५.५९ टक्के दरासह दुसऱ्या तर, नगर जिल्हा ५.३५ टक्के दरासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com