मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकिय निवास्थानावर लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील आणखी एका शासकीय कर्मचाऱ्याला कोविड-19 चा संसर्ग झाला
मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव
मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालयात कोरोनाचा पुन्हा शिरकावSaam Tv

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या वर्षा या शासकिय निवास्थानावर लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील आणखी एका शासकीय कर्मचाऱ्याला कोविड-19 चा संसर्ग झाला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD सुधीर नाईक यांचा कोविड चाचणी अहवाल पाँझिटीव्ह आला होता. यानंतर आता आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

हे देखील पहा-

मुख्यमंत्र्यांच्याच वर्षा निवास्थानी कोविड-19 चा शिरकाव झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD सुधीर नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना वोक्हार्ट हाँस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी करण्यात येतं आहे.

त्याचवेळी आता आणखी एक कर्मचारी कोविड-19 चाचणीमध्ये पाँझिटिव्ह आल्याने मुंबई महापालिकेने आता अधिक सतर्क होत सॅनिटायजेशन सुरू करण्यात आले आहे. वर्षा निवास्थान परिसरात सर्व शासकीय आणि खासगी निवास्थानी रहात असलेल्या नागरिकांचे दोन्ही डोस पुर्ण झाले आहेत की नाही..?याची सखोल तपासणी आता बीएमसीकडून सुरू करण्यात आली आहे.

मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव
Winter Session 2021: राज्याचं हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार

तसेच गरज भासल्यास आजारी आणि संशयित व्यक्तींची कोविड-19 चाचणी करण्यात येणार आहे. या अगोदर मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील २० तारखेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रश्मी यांची चाचणी केली असता, त्यांचा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी कोरोनावर मात करण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com