पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध कायम

शहरातील दुकाने पूर्वीप्रमाणे दुपारी चार वाजेपर्यंतच उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पुणे आणि  पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध कायम
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध कायमSaam tv

पुणे - पुणे Pune, पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या सुरु असलेले कोरोनाचे Corona निर्बंध यापुढेही कायम ठेवण्यात आले आहेत. शहरातील दुकाने पूर्वीप्रमाणे दुपारी चार वाजेपर्यंतच उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय फेरीवाल्यांना चार वाजल्यानंतर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला असल्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शहरातील सर्व दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मागणी केली होती. परंतु कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे दुकानांच्या वेळेत बदल करण्याबाबत आणि निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेतला नाही.

हे देखील पहा -

सद्यःस्थितीत पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा दर ४.९ टक्के, पिंपरी चिंचवडमधील ५ टक्के तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा दर ७.३ टक्के इतका आहे. जिल्ह्याचा सरासरी कोरोनाबाधित दर हा ६ टक्के आहे. शिवाय संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील कायम आहे. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. हा विकेंड लॉकडाऊन यापुढेही कायम राहणार आहे.

पुणे आणि  पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध कायम
डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली; मनिषा खत्री या नवीन जिल्हाधिकारी

सुट्टीच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळी आणि तीर्थक्षेत्रावर गर्दी करत असतात. या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. यामुळे विकेंड लॉकडाऊन शिथिल केला जाणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. पालकमंत्री पवार यांनी काल पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com