Pune Corona Update: पुण्यातील कॉलेजमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली, ऑफलाईन परीक्षेमुळे विद्यार्थी-शिक्षकांना संसर्ग झाल्याचा आरोप

पुण्यातील भारत इंग्लिश स्कुल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 11 वीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आली आहे.
Corona
CoronaSaam Tv

पुणे: राज्यात सध्या कोरोना, ओमिक्रॉनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, पुण्यातील भारत इंग्लिश स्कुल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 11 वीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आली आहे. ऑफलाईन परीक्षेमुळे कित्येक विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे (Corona Restrictions Violation In Pune College Take Offline Exam Students Get Infected). 

Corona
Nagpur Corona Update: नागपूर जिल्ह्यातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंदच राहणार

15 फेब्रुवारी 2022 पर्यंत राज्यातील कोणत्याही शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे फिजिकल क्लासेस किंवा फिजिकल परीक्षा घेण्यात येऊ नये, अशा सूचना राज्य सरकारने शाळा (School) आणि कॉलेजेसना (College) दिल्या. मात्र, त्यानंतरही भारत इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा (Offline Exam) घेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला आहे. म्हणून ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आता भारत इंग्लिश स्कुल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर (Social Media) कॅन्सल एक्झाम नावाची मोहीम सुरू केली आहे.

Corona
Corona Restrictions In Delhi: दिल्लीतील अनेक निर्बंध हटवले, जाणून घ्या काय सुरु काय बंद?

विद्यार्थी (Students) सोशल मीडियावर कॅन्सल एक्झाम ही मोहीम चालवित आहेत. मात्र, त्यांच्या मोहिमेची दखल शिक्षण विभाग किंवा इतर कोणीही घेत नसल्याने, स्वतःभारत इंग्लिश स्कुल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षिका वैशाली कुलकर्णी यांनी पुढे येत स्वतःच्या कॉलेजची तक्रार पुण्याचे जिल्हाधिकारी (Pune Collector) आणि शिक्षण विभागाकडे (Department Of Education) केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कॉलेजला शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त समज द्यावी अशी मागणी वैशाली कुलकर्णी या शिक्षिकेने केली आहे.

भारत इंग्लिश स्कुल अँड ज्युनियर कॉलेज प्रिन्सिपल उज्वला पिंगळे यांनी आम्हाला राज्य शासनाचे कोणतेही परिपत्रक मिळालाच नसल्याचा दावा केला आहे. आम्ही सोशलडिस्टन्स पाळून विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेतल्या आणि यात विद्यार्थ्यांना काहीच त्रास झाला नसल्याचा दावा उज्वला पिंगळे यांनी केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये एका जागी बसून लिहिण्याची सवय निर्माण व्हावी आणि त्यांची हॅण्ड रायटिंग देखील सुधारावी म्हणून आम्ही ऑफलाईन परीक्षा घेतल्याचा दावा प्रिन्सिपल उज्वला पिंगळे यांनी केला आहे.

कोरोनाच्या (Corona Virus) पहिल्या दुसऱ्या लाटेनंतर 18 वर्षावरील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. त्यामुळे 18 वर्षेवरील विद्यार्थ्यांना कोरोना आजारापासून लढण्याचं बळ मिळालं. मात्र, जे विद्यार्थी 18 वर्षाखालील आहेत. त्यांना अजूनही कोणती कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळाली नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. याचा विसर भारत इंग्लिश स्कुल अॅण्ड ज्युनियर कॉलेजच्या प्रशासनाला पडला आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com