१२ ते १८ वर्षे वयोगटाकरिता कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण

कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण
१२ ते १८ वर्षे वयोगटाकरिता कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण
१२ ते १८ वर्षे वयोगटाकरिता कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्णSaam Tv

मुंबई : कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने, देशामध्ये लहान मुलांना कोरोनाची लस Vaccine दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतामधील India आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या Cadillac १२ ते १८ वर्षे वयोगटाकरिता कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण केले आहेत. यामुळे पुढील महिनाभरात ही लस लवकरच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने Central Government यावेळी दिली आहे. Corona vaccine children aged 12 to 18 yearsdvj97

हे देखील पहा-

लहान मुलांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हळू- हळू कमी होत असताना दिसून येत आहे. यामुले आता सरकारकडून कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही तयारी करण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट ही धोकादायक असून, यामध्ये लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याच म्हटले जात आहे.

या पार्श्वभूमीवर लहान मुलांकरिता लवकरात लवकर कोरोना लसीकरण सुरु करा ही मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने १२ ते १८ वर्षे वयोगटामधील मुलांकरिता कोरोना लस कधी मिळणार असा प्रश्न करत थेट याचिका दाखल केली गेली आहे. या याचिकेमध्ये केंद्र सरकारने एका शपथ पत्राच्या सोबतीने उत्तर दिले आहे. Corona vaccine children aged 12 to 18 yearsdvj97

१२ ते १८ वर्षे वयोगटाकरिता कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण
२ ते १८ वयोगटातील मुलांवर कोरोना लशीच्या चाचणीला मंजूरी

केंद्र सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार, झायडस कॅडिलाची लस ऑगस्टमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कंपनीने मागील १ जुलै दिवशी याबाबतची माहिती दिली होती. झायडस कॅडिलानं १२ ते १८ वर्षे वयोगटामधील डीएनएवर DNA आधारित असलेल्या, कोरोना प्रतिबंधात्मक लस ZyCoV-D ची निर्मिती केली जात आहे. या लसीच्या क्लिनिकल चाचण्या नुकत्याच पूर्ण करण्यात आले आहेत.

यामुळे पुढील ४५ ते ६० दिवसामध्ये ZyCoV-D लस उपलब्ध होणार आहे. ही लस भारतीय औषध महानियंत्रकांकडे मंजुरीकरिता पाठवण्यात आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव सत्येंद्र सिंह यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, झायडस कॅडिलाने १२ ते १८ वर्षे वयोगटामधील लसीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. या लसीना लवकरच परवानगी देण्यात येईल. यानुसार १२ ते १८ वर्षे वयोगटामधील व्यक्तींच्या लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. Corona vaccine children aged 12 to 18 yearsdvj97

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com