सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार अर्ज कोर्टाकडून मंजूर;अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार ?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाची नवीन माहिती समोर आली आहे.
Sachin Vaze And Anil Deshmukh
Sachin Vaze And Anil Deshmukh Saam Tv

सूरज सावंत

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाची नवीन माहिती समोर आली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा माफीचा साक्षीदार अर्ज मुंत्रई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. वाझेच्या माफीचा साक्षीदार बनण्याच्या अर्जाला मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने मंजुरी दिली आहे. मात्र, त्यासोबत कोर्टाने अटी आणि शर्थी दिल्या आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) याचा माफीचा साक्षीदाराचा अर्ज मंजूर झाल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) अडचणी आता वाढणार आहे. ( Sachin Vaze Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Ex-Home Minister Anil Deshmukh) यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या माफीचा साक्षीदाराचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. मात्र त्यासोबत कोर्टाने अटी आणि शर्थी दिली आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात अडचणी वाढणार आहे.

Sachin Vaze And Anil Deshmukh
मी एक सीडी लावली तर महाराष्ट्र हादरेल; करुणा शर्मांच्या वक्तव्याने खळबळ

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख सध्या कोठडीत आहेत. १०० कोटी वसुली प्रकरणात मागच्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची उकल केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात याअगोदर सचिन वाझेचा हात असल्याचे याअगोदर रिपोर्टमधून समोर आले आहे. आता सचिन वाझे १०० कोटी वसुली प्रकरणात माफीचा साक्षीदार झाल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहे. त्यामुळे सचिन वाझे कोर्टात आता काय साक्ष देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com