छोटा राजन विरोधात क्लोजर अहवालाला न्यायालयाकडून मान्यता

ज्यावेळी आरोपीविरोधात तपास यंत्रणेकडे कोणतेही पुरावे नाहीत असे यंत्रणेला वाटते त्यावेळी त्याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी हा क्लोजर अहवाल सादर केला जातो.
छोटा राजन विरोधात क्लोजर अहवालाला न्यायालयाकडून मान्यता
छोटा राजन विरोधात क्लोजर अहवालाला न्यायालयाकडून मान्यता saam tv

सूरज सावंत

मुंबईतील बांधकाम व्य़ावसायिक (Builder) आणि फायनान्सर (Financer) युसूफ लकडावाला (Yusuf Lakadawala) याच्यांवर 2001 मध्ये गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या छोटा राजनच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (CBI) 'क्लोजर'अहवाल (closer Report) सादर केला होता. हा अहवाल शनिवारी मुंबईच्या विशेष न्यायालयाने (Mumbai Special Court) मान्य केला आहे. ज्यावेळी आरोपीविरोधात तपास यंत्रणेकडे कोणतेही पुरावे नाहीत असे यंत्रणेला वाटते त्यावेळी त्याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी हा क्लोजर अहवाल सादर केला जातो. (Court approves closure report against Chhota Rajan)

छोटा राजन विरोधात क्लोजर अहवालाला न्यायालयाकडून मान्यता
मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच; तर राणे समर्थकांमध्ये जल्लोष

सुनावणीवेळी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी हा अहवाल स्वीकारला आणि छोटा राजनवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 169 (पुरावा नसल्यामुळे आरोपींची सुटका) अंतर्गत त्याला मुक्त करण्याची सूचना केली. तसेच न्यायालयाने राजनला 50, 000 रुपये व्यक्तिगत जातमुचलका भरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कोर्टाच्या या आदेशानंतरही राजन तुरूंगातून बाहेर येणार नाही, याचे कारण म्हणजे त्याच्यावर इतरही अनेक गुन्हे दाखल असून त्याप्रकरणी खटले सुरू आहेत.

केंद्रीय अन्वेषण विभागाने सुमारे तीन महिन्यांपूर्वी 'क्लोजर' अहवाल दाखल केला असल्याची माहिती यावेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. तर छोटा राजनचे वकील तुषार खंदारे यांनी या प्रकरणी माहिती देताना म्हटले आहे की, लकडावाला हल्ला 2001 मध्ये उपनगरी वांद्रे येथे झाला होता. राजन आणि इतर काही जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल आणि महाराष्ट्र नियंत्रित संघटित गुन्हे अधिनियम (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ऑक्टोबर 2015 मध्ये छोटा राजन याने इंडोनेशियात स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. तेव्हापासून राजन दिल्लीच्या तिहार तुरूंगात बंद आहे. 2011 मध्ये पत्रकार जे डे यांच्या हत्येसह सुमारे 70 प्रकरणांमध्ये राजन आरोपी आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यानंतर लकडावाला न्यायालयीन कोठडीतही आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com