'न्यायालयाला धमकी देऊन न्याय मिळत नसतो, संप मागे घ्या': अनिल परब

ऐन सणाच्या वेळी राज्यामध्ये एसटी बसेस बंद होते.
'न्यायालयाला धमकी देऊन न्याय मिळत नसतो, संप मागे घ्या': अनिल परब
'न्यायालयाला धमकी देऊन न्याय मिळत नसतो, संप मागे घ्या': अनिल परबSaam Tv

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवाळीच्या अगोदरपासून सुरू झाले आहे. ऐन सणाच्या वेळी राज्यामध्ये एसटी बसेस बंद होते. काही ठिकाणी कामगारांनी संप केला, तर काही ठिकाणी आंदोलन करून, बस आगार बंद ठेवण्यात आले. या प्रकरणावर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीमध्ये जे समोर येईल, त्याचा राज्य सरकार अवलंब करणार आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा-

उच्च न्यायालयाचा निकाल सर्वांना बंधनकारक राहिले असे ते म्हणाले आहेत. निदर्शने, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, न्यायालयासमोर आत्मदहनाची धमकी देणे योग्य नाही, असे परब यावेळी म्हणाले आहेत. धमकी देऊन काही मिळत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. सरकारने नेमलेल्या समितीवर विश्वास नसल्यामुळे नवी समिती स्थापन करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी केली आहे.

'न्यायालयाला धमकी देऊन न्याय मिळत नसतो, संप मागे घ्या': अनिल परब
अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

या मागण्यांवर अहवाल देण्याकरिता निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात जोर दिला आहे. दरम्यान, चर्चेऐवजी नकारात्मक दृष्टीने का बघता, असा सवाल उच्च न्यायालयाने एसटी कामगार संघटनेला यावेळी केला आहे. तसेच चर्चेकरिता शिष्टमंडळ पाठवण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com