स्मारक उभारण्याच्या आधीच शिवसेना आणि भाजप मध्ये श्रेयवाद!

कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्याच्या आधीच शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात श्रेयवाद पेटला आहे.
स्मारक उभारण्याच्या आधीच शिवसेना आणि भाजप मध्ये श्रेयवाद!
स्मारक उभारण्याच्या आधीच शिवसेना आणि भाजप मध्ये श्रेयवाद!प्रदीप भणगे

कल्याण: कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्याच्या आधीच  शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात श्रेयवाद पेटला आहे.  अनेक वर्षांपासून कल्याण पूर्वेला आंबेडकर स्मारक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. महापालिकेच्या ड प्रभाग समितीच्या नजीक असलेल्या उद्यानाची 8000 चौरस मीटर जागा आहे. त्याच जागेत 1300 चौरस मीटर जागेत आंबेडकरांचे स्मारक उभे करण्याची मागणी केली जात होती. मात्र या जागेवर आरक्षण असल्याने स्मारक उभे कसे राहणार असा प्रश्न होता.

हे देखील पहा :

आता हे आरक्षण बदलण्यात आले असून त्यासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. स्मारकाच्या कामाचा डीपीआर तयार करुन लवकर निविदा काढली जाईल. स्मारकाचे काम लवकर सुरु केले जाईल. आरक्षण बदल आणि निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे स्मारक उभे राहत असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तर स्मारकासाठी राज्य सरकारकडून जी परवानगी हवी होती. ती मी आणून दिली आणि सातत्याने पाठपुरावा केला, असे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले.

स्मारक उभारण्याच्या आधीच शिवसेना आणि भाजप मध्ये श्रेयवाद!
बायकोच्या प्रियकराला कापून मृतदेह भट्टीत जाळला! 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे खून
स्मारक उभारण्याच्या आधीच शिवसेना आणि भाजप मध्ये श्रेयवाद!
२० वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार! लोणी पोलिसात गुन्हा दाखल
स्मारक उभारण्याच्या आधीच शिवसेना आणि भाजप मध्ये श्रेयवाद!
नगरमध्ये विवाहितेवर दोनदा सामूहिक बलात्कार!

तसेच आता फक्त निवडणूका जवळ आल्याने दलित समाजाला खूष करण्यासाठी शिवसेना श्रेय लाटत असल्याचा आरोप गायकवाड यांनी पत्रकरांना माहिती देताना केला आहे.स्मारकाचे श्रेय घेण्याऐवजी समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, या मागणीचा पुनरुच्चारही आमदार गायकवाड यांनी केला. दुसरीकडे आज स्मारक समितीच्या वतीने स्मारकाच्या जागेच्या ठिकाणी शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड, रमेश जाधव, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे भारत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com