उल्हासनगरात डान्सबारवर गुन्हे शाखेची धाड

१७ बारबालांसह वेटर आणि ग्राहक ताब्यात
उल्हासनगरात डान्सबारवर गुन्हे शाखेची धाड
उल्हासनगरात डान्सबारवर गुन्हे शाखेची धाडSaam Tv

उल्हासनगर - डान्सबारवर कारवाई करत गुन्हे शाखेने बारबालांसह वेटर आणि ग्राहकांना ताब्यात घेतले. चांदनी नावाच्या बारवर ही कारवाई करण्यात आली आहे.उल्हासनगरच्या १७ सेक्शन चौकाजवळ चांदनी नावाचा बार आहे. या बारमध्ये बारबाला बीभत्स नृत्य करत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी स्वतः पथकासह शनिवारी रात्री उशिरा या बारवर धाड टाकली.

हे देखील पहा-

यावेळी बारमध्ये १७ बारबाला अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे समोर आल्याने या बारवर कारवाई करण्यात आली. यावेळी १७ बारबाला, १३ वेटर्स आणि १० ग्राहकांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. उल्हासनगर शहरात अनेक डान्सबार असून एक दिवस कारवाई झाली की पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून हे बार सुरू होतात. त्यामुळे बारवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.