Pune Crime : पॉर्नसाईटवर डॉक्टर युवतीचा मोबाईल नंबर टाकला; अन्...

एका उच्च शिक्षित डॉक्टर मुलीने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी माझ्या स्वखुशीने आत्महत्या करत असंल्याच कळवले. कोणीतरी विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने डॉक्टर महिलेचा फोटो आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा पर्सनल मोबाईल नंबर हा विदेशातील पॉर्न साईटवर अपलोड केला होता.
Pune Crime : पॉर्नसाईटवर डॉक्टर युवतीचा मोबाईल नंबर टाकला; अन्...
Pune : पॉर्नसाईटवर डॉक्टर युवतीचा मोबाईल नंबर टाकला; अन्...SaamTvNews

पिंपरी चिंचवड : एका उच्च शिक्षित डॉक्टर मुलीने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी माझ्या स्वखुशीने आत्महत्या करत असंल्याच कळवले. डॉक्टर मुलगी आत्महत्या करण्यासारख टोकाचं पाऊल उचलत आहे, हे कळताच पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलिसांनी डॉक्टर महिलेला वाचविण्यासाठी लगेच तिच्या राहत्या घरी धाव घेत तिला वाचवलं आहे. मात्र, पोलिसांनी या मुली कडे तू आत्महत्या करण्यासारखा अतिशय टोकाचं पाऊल का उचललस? या विषयी चौकशी केली असता. एक धक्कादायक माहिती समोर आली. कुणीतरी विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने तक्रारदार डॉक्टर महिलेचा फोटो आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा पर्सनल मोबाईल नंबर हा विदेशातील पॉर्न साईटवर अपलोड केला होता.

हे देखील पहा :

त्यामुळे तक्रारदार डॉक्टर महिलेला सतत वेगवेगळ्या मोबाइल नंबर वरून अतिशय अश्लिल भाषा असलेले किळसवाणे फोन कॉल येऊ लागले. पॉर्नसाईटवर आपली कुणीतरी विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने बदनामी केली. हे शेवटी लक्षात येताच पीडित डॉक्टर महिलेने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले होते. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील  सांगवी पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे आज एका सुसंकृत घरातील निष्पाप डॉक्टर मुलीचा जीव वाचला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलिसांनी या डॉक्टर महिलेचा जीवच नाही वाचवला,  तर तिची डिजिटल वेबसाईटवर सत्त होणारी बदनामी देखील थांबवली आहे. पीडित महिलेचा पोलिसांविषयी विश्वास निर्माण होताच,  तिने सायबर सेलकडे अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.  तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी  तक्रारदार महिलेचे विदेशातील पॉर्न साईड वरून छायाचित्र आणि खासगी मोबाईल नंबर उडवून टाकलाय. 

Pune : पॉर्नसाईटवर डॉक्टर युवतीचा मोबाईल नंबर टाकला; अन्...
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
Pune : पॉर्नसाईटवर डॉक्टर युवतीचा मोबाईल नंबर टाकला; अन्...
Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!

किळसवाणे कृत्य करून डॉक्टर महिलेला मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तीचा आम्ही लवकर शोध घेऊन त्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असं आश्वासन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी डॉक्टर महिलेला दिले आहे.  सध्या डिजिटल युग आहे. अशा डिजिटल युगात एखाद्या मुलीने जर एखाद्याला प्रेमात नकार दिला किंवा एखादी मुलगी आपल्या हाताला आली नाही तर असे विकृत मानसिकतेचे व्यक्ती निष्पाप महिलांना नाहक त्रास देण्यासाठी त्यांची खाजगी माहिती पॉर्न साईट वर मानसिक छळ करण्यासाठी अपलोड करत असल्याचे या प्रकरणातून दिसून येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com