Crime News: संतापजनक! पनवेल रेल्वे स्थानक परिसरात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधमाला अटक

याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून चिमुकलीवर पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Panvel Crime News
Panvel Crime NewsSaam Tv

सिद्धेश म्हात्रे...

Panvel News: पनवेल रेल्वे स्थानक परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आई लघुशंकेसाठी गेल्याचा फायदा उचलत या नराधमाने मुलीला उचलून नेत शेजारी असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी तिच्यावर बलात्कार करत तेथून पळ काढला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली असून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi Update)

Panvel Crime News
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याची शक्यता, विरोधक आक्रमक

याबाबत अधिक माहिती अशी की, पनवेल (Panvel) रेल्वे स्थानकावर पीडित मुलगी आपल्या आईसोबत झोपली होती. यावेळी आई लघुशंकेसाठी गेली असल्याचा गैरफायदा घेत नराधमाने ३ वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेत जवळच असलेल्या निर्मनुष्य जागेत नेत तिच्यावर अत्याचार करुन तिथून पळून काढला. आई परत आल्यानंतर मुलगी गायब झाल्याचे लक्षात येताच शोधाशोध करत पनवेल रेल्वे पोलीस ठाणे गाठत याबद्दलची माहिती देण्यात आली.

यावेळी पोलिसांनी तपास सुरु केला असता सदर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी तात्काळ 3 टीम बनवत आरोपीचा शोध सुरु केला.

Panvel Crime News
Chinchwad Election: चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का! पराभवानंतर नाना काटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; 'बंडखोरीचा फटका...'

दरम्यान, पोलिसांनी शोध घेतल्यानंतर जुईनगर रायळेलाय स्थानकावर मनोज कुमार या संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची कसून तपास केला असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. तसेच तो कळंबोली ब्रिजखाली वास्तव्य करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून चिमुकलीवर पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com