
सचिन गाड
मुंबई : अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीने त्यांच्यातले व्हिडिओ डिलिट करण्यासाठी तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खंडणी न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं आता समोर आली आहे. शुक्रवारी तिला कोर्टात हजार केले असता कोर्टाने तिची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. (Latest Marathi News)
पोलिसांच्या (Police) ताब्यात असलेली ही आहे अनिक्षा जयसिंघानी, ही तीच महिला आहे. जिने दुसऱ्या कोणाला नव्हे तर थेट राज्याचे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.
आधी कपडे आणि ज्वेलरी डिझायनर असल्याचा बनाव करून तिने अमृता यांच्या जवळीक साधली होती. त्यानंतर वडील म्हणजे कुप्रसिद्ध बुकी अनिल जयसिंघानी यांना त्यांच्या विरोधातील गुन्ह्यात मदतीसाठी अमृता यांच्याकडे तगादा लाऊ लागली. जेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला, तेव्हा तिचा खरा चेहरा समोर आला.
"माझे वडील तुमच्यावर नाराज आहेत, तुम्हाला माहीत नाही ते कोण आहेत, पण मला माहिती आहे ते काय करू शकतात, अशी धमकी अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना दिला. अमृता फडणवीस यांना जाळ्यात ओढून आपल्या वडिलांविरोधातील गुन्ह्यात मदत मिळणे हा तिचा मुख्य उद्देश होता.
सुरूवातीला तिने बुकीवर कारवाई करण्याचा बहाणा करून पैसे कमवण्याच्या भूलथापा दिल्या नंतर वडिलांविरोधातील गुन्ह्यात मदतीसाठी १ कोटी रुपये देण्याचं आमिष दाखवलं आमिष दाखवल आणि नकार मिळताच धमकी आणि खंडणीच सत्र सुरू केलं.
वडिलांना त्यांच्या विरोधातील गुन्ह्यात मदत करण्यास नकार दिल्यानंतर अनोळखी फोन वरून अमृता फडणवीस यांना २२ व्हिडिओ क्लिप्स ३ व्हॉईस नोट्स आणि काही स्क्रीन शॉट्स पाठवण्यात आले तर दुसऱ्या दिवशी तब्बल ४० मेसेजेस मिसेस फडणवीस यांना केले. एफआयआर २० तारखेला झाला. मात्र पोलिसांनी तिला ते समजू दिला गेलं नाही.
कारण पोलिसांना तिच्या वडीलांपर्यंत पोहोचायचं होत. तसेच ती आणखीन काय लपवते आहे का याचा छडा लावायचा होता. मात्र एफआयआरची बातमी लीक झाली आणि तिला अटक करणे पोलिसांना भाग पडलं. आत्ता पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जायचं आहे आणि या सगळ्याच्या पाठी नक्की कोण आहे याचा उलगडा लावायचा आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.