Crime News
Crime News Saam TV

Crime News: सूनेच्या मासिक पाळीचं रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकलं; सासू-दिराचं लाजिरवाणं कृत्य; बीडमधील घटना

पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 27 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सचिन जाधव

Pune News: पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. बीडमधून एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. सासू आणि दिराने आपल्या सुनेच्या मासिक पाळीचं रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 27 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकार ऑगस्ट 2022 मधील असल्याचं तक्रारदार महिलेनं सांगितलं आहे. आपण बीडला सासरी गेलो असताना सासू आणि दिराने आपल्यासोबत हा घाणेरडा प्रकार करून हे मासिक पाळीचं रक्त कापसाने टिपून एका बाटलीत जमा केलं आणि ते मांत्रिकाला 50 हजारांना विकल्याचं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. (Latest News Update)

Crime News
Mumbai News : होळी खेळून आल्यानंतर पती-पत्नी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले; दोघांचाही मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी बीड पोलिसांकडे ही केस वर्ग केली आहे. विवाहानंतर ही महिला बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. २६ जून २०१९ पासून तिचा पतीसह नातेवाईकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता.

Crime News
Dhule News: भर चौकात शस्‍त्राचा धाक दाखवून लूट; मुद्देमालासह दोघे चोरटे ताब्‍यात

मनिषा कायंदे अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा

आमदार मनिषा कायंदे या घटनेबाबत विधानपरिषदेत आवाज उठवला. पुण्यात विश्रामवाडी येथे महिलेच्या मासिक पाळीचे रक्त ५० हजार रुपयांना तांत्रिकाला विकल्याचा प्रकार माध्यमांच्या माध्यमातून आमच्या समोर आला आहे. हा नवीनच प्रकार समोर आला असून यात अटक झालेली आहे. अशा मांत्रिकांच्या टोळीवर गृह विभागाकडून गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून उचीत कारवाई करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com