Crime News: चारित्र्याच्या संशयावरुन पतीचा पत्नीवर हल्ला

शुक्रवारी आरोपीची पत्नीसोबत जरदार भांडण झाले. यावेळी राग अनावर झालेल्या आरोपीने हातातील चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार केले.
Crime News: चारित्र्याच्या संशयावरुन पतीचा पत्नीवर हल्ला
Crime News: चारित्र्याच्या संशयावरुन पतीचा पत्नीवर हल्ला Saam Tv

सुरज सावंत

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. घाटकोपरच्या (Ghatkopar) हनुमान गल्ली (Hanuman galli) नेताजी जुनी कामराज नगर (Kamraj Nagar) परिसरात हे पती-पत्नी हे राहतात.

हे देखील पहा-

मागील अनेक दिवसांपासून पती-पत्नींमध्ये शुल्लक कारणांवरून वाद व्हायचे. पोलिसांच्या चौकशीत पत्निच्या चारित्र्यावर आरोपी संशय घेत असल्याने हा वाद विकोपाला जायचा.

दरम्यान शुक्रवारी आरोपीची पत्नीसोबत जरदार भांडण झाले. यावेळी राग अनावर झालेल्या आरोपीने हातातील चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार केले. या हल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेहण्यात आले.

Crime News: चारित्र्याच्या संशयावरुन पतीचा पत्नीवर हल्ला
Heart Care: ह्रदयाच्या आरोग्यासाठी आल्या'ची भाजी आहे गुणकारी, एकदा वाचाच

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. या प्रकरणी पंतनगर पोलिस अधिक तपास करत आहे.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com