Crime News: मृत महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्याची चोरी, हॉस्पिटल कर्मचाऱ्याला अटक

आरोपीने बांगड्या विरारमधील एका सोनाराकडे ३० हजार रुपयांवर गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
Navghar Police Station
Navghar Police StationSaamtv

Mira Road News: मृत महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या चोरल्याचा धक्कादायक प्रकार मिरारोडमध्ये घडला आहे. या संबंधित रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर केलेल्या चौकशीत आरोपीने बांगड्या विरारमधील एका सोनाराकडे ३० हजार रुपयांवर गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News Update)

Navghar Police Station
PMPL News: पुण्यातील महिलांसाठी खुशखबर! दर महिन्याच्या 'या' तारखेला करता येणार मोफत प्रवास; पाहा कोणत्या मार्गावर धावणार बस..

याबाबत अधिक माहिती अशी की, २५ फेब्रुवारी रोजी मीरा रोडमधील कनाकीया परिसरात राहणाऱ्या रहीम शेख यांच्या आईची प्रकृती चिंताजनक झाली होती. यावेळी शेख यांनी घरीच आईच्या उपचारासाठी डॉक्टरांना बोलावले होते.परंतु यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर रहीम शेख यांनी आईच्या अधिक तपासणीसाठी मीरारोड मधील फॅमिली केअर रुग्णालयात दाखल केले, तिथे ही डॉक्टरांनी त्यांच्या आईला मृत घोषित केले.

डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर रहीम शेख हे त्यांच्या आईला घेऊन रुग्णवाहिका मधून घरी आले ज्यानंतर घरी असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात आले की आईला रुग्णालयात दाखल करण्यावेळी हातात चार बांगड्या होत्या परंतु घरी आल्यावर फक्त दोन बांगड्या हातात राहिल्या आहेत. सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात येताच रहीम शेख यांनी नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Navghar Police Station
Old Pension scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुन्या पेन्शनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

या तक्रारीनंतर नवघर पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाची व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. या चौकशीमध्ये रुग्णालयातील कर्मचारी सगर तेजम याने सोन्याच्या दोन बांगड्या चोरल्याचे कबूल केले. दरम्यान कबूलीनंतर आरोपीला नवघर पोलिसांनी अटक केली असून आरोपीला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Crime News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com