Crime : झोपेच्या गोळ्या खाऊन महिलेची दोन मुलांसह आत्महत्या!

मीरा रोड वरील नया नगर येथे एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसोबत, झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
Crime : झोपेच्या गोळ्या खाऊन महिलेची दोन मुलांसह आत्महत्या!
Crime : झोपेच्या गोळ्या खाऊन महिलेची दोन मुलांसह आत्महत्या!SaamTv

मीरा/भाईंदर : मीरा रोड मधिल नया नगर परिसरातील नरेंद्र पार्क मधिल c2 इमारत मध्ये राहणाऱ्या नसरीन बानो (47) यांनी आपल्या 21 वर्षीय मुली व 13 वर्षीय मुलासह झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे.

हे देखील पहा :

प्राप्त माहितीनुसार नसरीन बानो यांची दोन्ही मुले हे अपंग होती. मुलगी सदाद नाज (21) व मुलगा मोहम्मद अर्ष (13) असे या दोन्ही मुलांचे नाव आहे. नसरीन बानो यांचा नवऱ्याबरोबर घटस्फोट झाला होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती व दोन्ही मुलांचे पालनपोषणची जवाबदारी नसरीन यांच्या वर आली होती.

Crime : झोपेच्या गोळ्या खाऊन महिलेची दोन मुलांसह आत्महत्या!
प्रेमविवाह केलेल्या तलाठी पतीने चारित्र्याच्या संशयावरून केला डॉक्टर पत्नीचा खून!

त्यामुळे झोपेच्या गोळ्या खाऊन दोन्ही मुलांसोबत आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच नया नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व शवविच्छेदन साठी तिन्ही शव मुंबईमधील जेजे रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. पुढील तपास नया नगर पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com