Crime : विरार रेल्वे स्थानकाजवळ चोरट्याकडून तरुणाची हत्या!

पाकीट चोरल्यानंतर पाठलाग करणाऱ्या तरुणाची केली हत्या !
Crime : विरार रेल्वे स्थानकाजवळ चोरट्याकडून तरुणाची हत्या!
Crime : विरार रेल्वे स्थानकाजवळ चोरट्याकडून तरुणाची हत्या!चेतन इंगळे

वसई-विरार : विरार रेल्वे स्थानकाजवळ एका चोरट्याने  तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हर्षल वैद्य असें या घटनेत मयत झालेल्या तरुणाचे नाव असून तो विलेपार्ले येथे राहणारा आहे. काल रात्री ११ वाजताच्या सुमारास हर्षल आपल्या विरार मधील  नातेवाईकांकडे पूजा आटपून पुन्हा घरी परतत होता.

हे देखील पहा :

यावेळी रेल्वे स्थानकात तिकीट काढत असताना एक चोरटा त्याचे पाकीट हिसकावून पसार झाला. हर्षदने त्याचा पाठलाग केला असता तो विरार रेल्वे स्थानकाबाहेरील श्रेया हॉटेल च्या गल्लीत लपून बसला तिथे हर्षद त्याला पकडण्यासाठी गेला असता चोरट्याने त्यावर धारधार चाकूने जीवघेणा हल्ला केला.

Crime : विरार रेल्वे स्थानकाजवळ चोरट्याकडून तरुणाची हत्या!
देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - भाई जगताप

या हल्ल्यात हर्षद या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्याने दाखवलेल्या धाडसामुळे या चोरट्याला पकडण्यात यश आले आहे. विरार पोलिसांनी या चोरट्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com